काँग्रेसचे ‘No corruption- मेरी गली में’ अभियान.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबईकरांच्या समस्यांवर बीएमसी प्रशासनाला जागे करण्यासाठी काँग्रेसचे ‘No corruption- मेरी गली में’ अभियान.

मुंबई:
मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा, खोदकाम, अपूर्ण कामे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे. मुंबईतील समस्यांना जबाबदार असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मोठे अभियान हाती घेण्याचा निर्,य मुंबई काँग्रेसने घेतला असून ‘No corruption- मेरी गली में’, Report, Respond, Reclaim our roads, हे अभियान सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

या अभियानाअंतर्गत प्रत्येक वार्डात काँग्रेस कार्यकर्ते, नागरी संघटनांच्या प्रतिनिधीसह वार्डातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्डे, खोदकाम, रखडलेली कामे, याची माहिती घेऊन महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करून त्याचा पाठपुरावा केला जाईल. स्थानिक पातळीवर बैठका घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. हे अभियान मुंबईतील प्रत्येक वार्डात राबवून बीएमसी प्रशासनाला जागे करा व नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे..

जागरूक नागरिक :चांगला उपक्रम परंतु काँग्रेस चे आमदार खासदार असलेल्या विभागात पण राबवणार का?? तसेच नुसतेच देखावा की घोषणा प्रत्यक्षात काँग्रेस चे एकूण कार्यकर्ते फलक घेऊन घोषणा पण देताना लाजतात?


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *