प्रतिनिधी :मिलन शहा.
मुंबई: कांदिवलीतील घरात महिला आणि मुलाचे मृतदेहआढळल्याने परिसरात खळबळ उडाली.कांदिवलीतील हनुमान नगर परिसरातील एका घरातून एका महिलेचे आणि तिच्या 8वर्षांच्या मुलाचे मृतदेह आढळून आले. मृत महिलेची ओळख पुष्पा दत्त वय 34 वर्ष अशी झाली.
सोमवारी सकाळी 7,30 ते दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. महिलेचा पती शिवशंकर दत्त टेम्पो चालक , घरी परतला तेव्हा त्याने दरवाजा ठोठावला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्याने खिडकीतून पाहिले तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मुलगा फासावर लटकलेले आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
समता नगर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.