
File Photo
प्रतिनिधी :मिलन शहा
Google ने भारतात Google one lite प्लॅन लाँच केला आहे. या अंतर्गत वापरकर्ते आता 30GB अतिरिक्त स्टोरेजचा आनंद घेऊ शकतात. विशेष म्हणजे वापरकर्ते याचा मोफत लाभ घेऊ शकतात. सध्या, Google one चा नवीन Lite प्लॅन फक्त निवडक वापरकर्त्यांना दाखवला जात आहे आणि सध्या त्याचा ॲक्सेस चाचणी म्हणून मोफत दिला जात आहे. Google one च्या मूळ प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 100GB क्लाउड स्टोरेज मिळते हे तुम्ही कुटुंबातील पाच सदस्यांसोबत शेअर करू शकता . त्याची मूळ चार्ज 130 रुपये आहे. मात्र नवीन लाईट प्लॅनची किंमत निम्म्याहून कमी ठेवण्यात आली आहे.