
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे रंगमंचावर,दिनांक 3 ऑगस्ट रोजी, गायक स्व.किशोर कुमार ह्यांच्या अविट गोडीच्या गीतांनी त्यांचे स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.बॉलीवूड च्या दुनियेतील सुवर्णं काळाला, त्यांचाही मोठा हातभार लाभला होता.ते स्वतः फिल्म निर्माते, गीतकार,संगीतकार,नट,दिग्दर्शक,पटकथाकार,गायक अशा अनेक अष्टपैलू करामत त्यांनी केलेली आहे.एक अवलिया,मस्तीखोर नट व गायक म्हणून त्यांची ख्याती होती.ते “यार्डले”गायक म्हणून प्रसिद्ध होते.अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. उपरोक्त सॅटर्डे सौलफूल या संचा तर्फे , गायकांनी एक्से एक गाण्यांचा नझराणा,मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या रसिकां समोर पेश केला.