परिक्षकालीन,प्रशासकीय अधिकारी,पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात?

Share

File photo
प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई “भारतीय प्रशासकीय सेवेतील”अधिकारीच,आपले राष्ट्र चालवतात.असे म्हटल्यास,ते वावगे ठरणार नाही.कारण मंत्री असो,मुख्यमंत्री असो, पंत प्रधान असो वा राष्ट्रपती असो, राजकरणी असो,ह्या लोकांची महत्वाची कामे त्यांचे सचिव हेच अधिकारी करतात.तर हेच आय पी एस.अधिकारी आय पी एस.च्या वर असतात.जसे आपण शिक्षण घेताना,शास्त्र अर्थात सायन्स निवडतो,त्या विद्यार्थ्याला वाणिज्य कॉमरस,कला आर्टस ला ही जाता येते,त्याप्रमाणे आयएएस.हा तसंम कोणत्याही ठिकाणी,आपल्या पसंतीनुसार हा अधिकारी जाऊ शकतो.भारतातील सगळ्यात कठीण व उच्चस्तरीय अशी हि सेवा परीक्षा आहे. पण सध्या दुरचित्रवाणीवर एक प्रशिक्षित प्रशाशकिय अधिकारी ,पूजा खेडकर ह्यांचे प्रकरण फारच गाजत आहे.त्या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे,त्यांच्यावर काही गंभीर आरोप आहेत.त्यामधे त्यांनी आपल्या पदाचा गैर वापर केलेला आहे.शिवाय त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी जातींची व वैद्यकीय खोटी प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत.त्या सध्या प्रशिक्षणार्थी असून,त्यानी सेवेसाठी अवच्या सव्वा मागण्या केल्या आहेत.ज्या अटित बसत नाहीत.तर त्यांनी आपल्या वैयक्तिक गाडीवर विनापरवाना लाल दिवाही लावला आहे. आपल्याला सेवेसाठी वेगळी जागा पाहिजे,अशीही तक्रार त्याची आहे.ह्या सगळ्या बाबी, प्रशिकशनार्थींना लागू होत नाहीत.ह्याची नोंद सरकारने घेतलेली आहे.म्हणून त्यांची बदली!पुण्याहून वाशिम येथे करण्यात आलेली आहे.केंद्रांने या प्रकरणाबाबत एक चौकशी गठित केलेली आहे.पुढील चौकशी सुरू आहे.वरील अनेक प्रकरणात त्यांना सरकारने चवकशीसाठी पाचारण केलं आहे,पण त्या गैरहजर राहिल्या.त्यामुळे संशय आणखीन बळावतो.
पूजा खेडकर ह्या कोण आहेत?
त्या32 वर्षीय 2023 चया तुकडीतील प्रशाशकिय अधिकारी आहेत.त्या महाराष्ट्रातून चांगल्या मार्कानी पास झालेल्या आहेत. सध्या त्या प्रशिक्षित अधिकारी आहेत.त्या स्वतः प्रशिक्षित वैद्यकीय चिकिसकही आहेत.त्यांनी यु पी एस सी.परीक्षा पास केली असून,पण ती ही वादादित आहे.तयांचे वडील दिलीप , खेडकर हे सुद्धा निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.सद्या ते राजकारणात आहेत.त्यांच्या मातोश्री भडक डोक्याच्या आहेत. परवा त्या दूरचित्रवाणीवर,हातात पिस्तूल घेऊन गावकऱ्यांना धमकवताना दिसल्या.त्याच गावच्या त्या सरपंचही आहेत.तो एका जमिनीचा वाद आहे.एकंदरीत 22कोटींची संपत्ती ह्या कुटुंबाकडे आहे.तीही पुजा खेडकरांनी सरकारला दाखवलेली नाही. एकंदरीत हे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडेले आहे.
जेंव्हा कुणीही आयपीएस.अधिकारी बनतो,तो आपल्या देश सेवेसाठी बनतो. आप सेवेसाठी नाही? हे त्याने लक्षात घ्यावे.जर का ह्या चौकशीत, पुजा खेडकर जर दोषी निघाल्या तर! ही पहिलीच भारतातील अशी केस असेल.वाईट एकच वाटत, की त्या महाराष्ट्राच्या आहेत व मराठीअसून, विद्येचे माहेरघर पुण्यातन आहेत.जर आपण खोटी प्रमाणपत्रे सादर करून जर, आय पी एस.झाल्या असल्या!तर तो मार्ग आपला योग्य नाही.कारण आपल्यामुळे एका लायक उमेद वाराचे नुकसान झालेले आहे. याची नोंद आपण घ्यावी.आपण तर उच्च सुशिक्षित असताना,हा मार्ग आपण का निवडला?ह्याच गोष्टीचे आश्चर्य लोकांना वाटते.आपण मिळवलेल्या मार्कांवर , हे निश्चित होते.पण पाहू तपासात काय निष्पन्न होतय.हा मात्र एक धडा परीक्षा देणाऱ्या पुढील उमेदवाराला आहे,हे निश्चित!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *