मुलुंडमध्ये राष्ट्रवादी चे आंदोलन 50टक्के घरे मराठी माणसांना देण्याची मागणी…

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

विशिष्ट समाजाची व्होट बँक बनवण्यासाठी ही भाजपची दीर्घकाळापासूनची रणनीती आहे-सरदार गुरुज्योत सिंग

मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सौ.तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मुलुंड पश्चिमेला मराठी असल्याचा कारणावरून घर नाकारण्यात आले आहे व ह्या घटना वारंवार घडत आहेत तरी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दिनांक 1ऑक्टोबर रोजी मुलुंड पश्चिमेला स्वप्नानगरी, सरदार गुरुज्योत कीर यांच्या कार्यालयाजवळ, मुलुंड काॅलनी येथे आंदोलन करण्यात आले.

भाजप सरकारने स्वतःच्या निवडणूक फायद्यासाठी येथील जनतेला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली.

आपल्या केंद्र सरकारच्या अर्धवट वागणुकीमुळे महाराष्ट्राला नेहमीच त्रास सहन करावा लागला आहे जिथे महाराष्ट्रातील विविध भत्ते आणि सुविधा गुजरातकडे हस्तांतरित केल्या गेल्या आहेत, आता वेळ आली आहे की आपल्या केंद्राच्या या अर्धवट वागणुकीच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या डोक्यावर असलेल्या गुजरातला आपल्या केंद्र सरकारच्या या अर्धवट वागणुकीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव -सरदार गुरुज्योत सिंग यांनी केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *