
प्रतिनिधी :सुरेश बोरले
आज च्या घडीला केंद्राच्या राजकारणामध्ये किंवा दिलीस्वरांमध्ये एकच माणूस कार्यक्षम आहे व उद्याचे होणारे पंतप्रधान!ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके , नितीन गडकरी साहेब! एक अतिशय बोलका कार्य तत्पर माणूस. नेहमी चेहऱ्यावर हसू फुलत असलेला, दिलं खुलास मंत्री! कोणाची चाड न ठेवणारा किंवा सत्याची बाजू नेहमीच मांडणारा. वेळ पडल्यास आपल्याच माणसाला,त्याच्या नेत्या समोर,तासून काढणारा, मंत्री. या मंत्र्यांनी कश्मीर पासून कायकुमारी पर्यंतचे रस्ते,हे एकदम झकास बनवलेले आहेत. ज्यावेळेस वाहने रस्त्यावरन जातात, त्यावेळेस पोटातील पाणी सुद्धा हालत नाही. इतके सुंदर रस्ते त्यांनी बांधलेले आहेत. ही किमया त्यांनी उत्तर ते दक्षिणेला केलेली आहे, पण साहेब वर खाली पाहताना, भारताच्या पश्चिम समुद्र किनारी,असणाऱ्या भारतीय कॅलिफोर्नियाला आपण विसरला त असे वाटते? अर्थात महाराष्ट्राच्या हिरव्यागार कोकणात,आज बहुतांशी जिल्ह्यात रस्त्याची दुरवस्था, पाहण्यासारखी नाही. खड्डे रस्त्यात की रस्त्यात खड्डा, ही म्हण आता जुनी झाली आहे. पावसातील पाझर तलाव असे आपण नामकरण करूया. आपण याच तलावात चारचाकी वाहने,डुलवत, डुलवत एखाद्या होडी सारखी नेतो. एखाद्या सुंदर तलावाचे नाहीतर, एखद्या सरोवराचे दृश्य दिसते. नैनीताल सरोवरात यांत्रिक बोटी तरंगतात,तर येथे चारचाकी पाण्यावर डोलतात.आहे की नाही किमया!पण आज मंत्री साहेब कोकणाच्या या रस्त्यांची दुरावस्था ही तर, पावसातली आहे. पण ही अवस्था सगळ्याच ऋतूं मध्ये अशीच असते.त्याच काय? आज आम्ही हे पाहताच मोठे झालो. साठी पर्यंत आलो, पण कोकणचे रस्ते काही तयार होत नाहीत,की मोठे होत नाहीत. जागो जागी चंद्र व मंगळ ग्रहा सारखे खड्डेच, खड्डे! काही काळ रस्ता चांगला पुन्हा खड बड,पुन्हा थोडा चांगला रस्ता,हे दुष्टचक्र कित्येक वर्षे आहे.कोकण वासियानी किती सहन करायचे? कोकण वासी हा सहनशिलआहे, म्हणून त्याचा अंत पाहता का? कारण कोकणवासीय कधी जास्त आंदोलने व धरणे किंवा घेराव असल्या गोष्टी करत नाही. त्याचे आंदोलन नेहमीच लोकशाहीला धरून असते.थोडक्यात गांधीवादी आंदोलन असते. संबंधित खात्यात तक्रार करेल, थोडक्यात मोर्चा नेईल,त्या खात्यातील साहेबा ला चपलांचे माळ घालण्या पेक्षा, हातात गुलाबाचे फुल किंवा पुष्पमाला देऊन, समज देऊन परत येईल. भारतामध्ये कधी ऐकले आहे की, कोकण वासियाने आंदोलन,मोर्चा दगडफेक केलेली आहे, वाहनांची तोडफोड केलेली आहे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केलेल आहे.पण इतर राज्यात ह्या गोष्टी सर्रास घडतात.म्हणून कोकणवासी हा सहनशील आहे,असा अर्थ होत नाही.वर्षा नु वर्षे तो ह्या रस्त्यांची हाल अपेष्टा सहन करतोय,याचा मतलब असा नाही की, कोकणवासी हा षंढ असून, तो लढावय्या नाही. महाराष्ट्राचे सह्याद्री मुळे दोन भाग पडतात. एक पठार व दुसरा डोंगर घाट माता. म्हणजे कोकण! या विभागाकडे, केंद्र काय महाराष्ट्र राज्य सुद्धा ढुंकून पाहत नाही. कारण कोकणाकडे सक्रिय व धनवान राजकारणी नाहीत. ज्याप्रमाणे पठारावर आमदार खासदार आहेत.म्हणून तेथे रस्ते व अनेक गोष्टी प्रगतीशिल आहेत. पठाराच्या धर्तीवर सगळे एकापेक्षा एक आहेत, हे विशेष. त्यांची मांदियाळी मोठी आहे. त्यामानाने कोकणात नाही. कारण कोकणातील चाकरमानी, आपली घरे बंद ठेवून, मुंबईला पोटा पाण्यासाठी असतो. शेती हा प्रकार आता कोकणात राहिलेला नाही. त्यामुळे खास करून,रस्ता विकास आंदोलन होत नाहीत.पण सणासुदीला व इतर कार्याला हा चाकरमानी ये जा करतो,तेव्हा त्याला रस्त्याचा,हा त्रास वर्षांन वर्ष सहन करावा लागत आहे. येथे ही सक्रिय राजकारणी आहेत,पण ते इतर नको त्या राजकारणात गुंतलेले आहेत. त्यामुळे येथे रस्त्याची व इतर विकासाची दुरावस्ता आहे. पण आता मात्र, दोन्ही सरकारे रस्त्या सहीत,इतर विकास कामांचा अंत पाहत आहेत. आता मात्र कोकणातील जनतेचा व चाकरमान्यांचा संयमाचा, तोल सुटलेला आहे. कित्येक वर्षाचा रस्ता आता शिव्या शाप संतापाचा विषय झालेला आहे.कदाचित ही वादळा पूर्वीची शांतता असावी? कारण येणाऱ्या काळामध्ये, मोठे व धारदार आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता होणारे जे आंदोलन,आहे ते वादळी असेल.जगाच्या नियमा प्रमाणे,जास्तीत जास्त अत्याचार, तेवढीच मोठी “क्रांती”!हे समीकरण आहे. त्याचा उपयोग आता कोकण वासिय, हक्काच्या रस्त्यासाठी केल्याशिवाय राहणार नाहीत. गडकरी साहेब ही येणाऱ्या वादळाची वावटळ आहे. याची आपण नोंद घ्यावी. ही जनमताची तयारी आहे.शेवटी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नुकतच चंद्र यान, भारताने अवकाशात सोडलेल आहे.त्या यानाने,कोकण रस्त्याची खड्डेमय छायाचित्रे पाठवलेली आहेत,ती लोकांना व आपल्याला पाठवीत आहे.