ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा चा हास्य कलाकार.गोप.

Share

प्रतिनिधी :सुरेश बोरले

file photo

.
हिंदुस्तानी फिल्मी जगताची सुरुवात एका मराठी माणसाने1913 सलि केली. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.त्यांच नाव स्वर्गीय. धुंडिराज गोविंद फाळके. अर्थात दादा साहेब फाळके. त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूक पट बनवला. इथूनच भारतीय चित्रपट दुनियेची सुरुवात झाली. त्यावेळी तंत्रज्ञान किंवा तांत्रिक बाबी इतक्या प्रगत नव्हत्या, अशा परिस्थितीतही, त्याकाळी ही, आपल्या अंगाच्या कलागुणांनी ही सिनेमाची ही चंदेरी दुनिया अनेक कलाकारांनी सावरली.त्यावेळी सिनेमात कामे करणे म्हणजे समाज तुच्छ समजायचा.खास करून महिला कलाकारांसाठी.असो!अशा या काळात जाडसर शरीराचा एक नट कृष्ण धवल जमान्यात पडद्यावर दिसायचा, आपल्या मुश्किल चेहऱ्याच्या अदांनी लोकांचे मने रीजवायचा.सहाय्यक कलाकार म्हणून या दुनियेत आलेला हा कलाकार, कधी हास्य अभिनेता बनला हे त्याचे त्यालाच कळले नाही.आपण आपल्या घरातल्या दूरचित्रवाणीवर कधीतरी शुभर धवल जमान्याचे एक गीत पाहतो. मेरे पिया गये रंगून,वहा से किया है टेलिफुन,तुम्हारी याद सताती है,जिया मे आग लगाती है. एका बाजूला स्त्री कलाकार आहे तुझ्या बाजूला, एक मजबूत गडी हातात टेलीफोन घेऊन गाणे म्हणतोय. हेच ते स्वर्गी.गोप यांचा जन्म 11 एप्रिल 1913 रोजी ब्रिटिश सिंध प्रांत हैदराबाद येथे झाला. अभिनयाची आवड त्यांना या दुनियेत घेऊन आली. 1933 स्वर्गीय. मोती गिडवाणी दिग्दर्शित व ईस्टर्न आर्ट निर्मित, इंसान ऑर शैतान या चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली. त्याकाळी सिनेमा हा मुकपटातून पासून ते बोल पटात बदलला होता. त्यामुळे लोकांना हा झालेला बदल पाहण्याची इच्छा होती.त्या मध्ये पोस्टवर स्वर्गीय.गोप असल्यास प्रेक्षक त्यांना पाहण्यासाठी हमखास गर्दी करायचे. या नगरीत कामे करता करता,ते एक मोठे हास्य कलाकार झाले. जवळजवळ 140 चित्रपटात त्यांनी नानाविध प्रकारची कामे करून लोकांची मनोरंजन सेवा केली. 1933ते १९५७ म्हणजे 24 वर्षे ते या सेवेत होते. एक सरळ स्वभावाचा माणूस म्हणून ते लोकप्रिय होते. ज्याप्रमाणे हॉलीवुडच्या जगतात जाड्या रड्या सारखी जोडी फारच लोकप्रिय होती, त्याप्रमाणे स्वर्गीय.गोप व स्वर्गीय. युसुफ यांची जोडी त्याकाळी प्रसिद्ध होती. त्या वेळच्या दिग्दर्शक व निर्मात्यांनी या जोडीला प्रार्थना दिले होते. आणि ही जोडी चमकली.तर स्वर्गीय.गोप यांनी अनेक मुख्य कलाकारां सोबत,सह कलाकाराची केलेली कामे अजूनही,काही जुन्या सिने प्रेमींना आठवतात. आजही स्वर्गीय.गोप हे जुन्या जमान्याचे लोकप्रिय कलाकार आहेत. चित्रपट सेवेत त्यांच्या कामाच मोठे योगदान आहे. स्वर्गीय.गोप यांचे संपूर्ण नाव गोप विश्वनाथ कमलानी सिंधी परिवारातील होते. वडील ऑडिटर होते. स्वर्गीय.गोप यांनी स्वर्गीय.लतिका या नटी बरोबर विवाह ही केला.त्यांना दोन अपत्यही झाली. त्यांनी काही चित्रपटात खलनायक ही साकारला होता.त्यात ह्या हसवणाऱ्या कलाकाराने नंतर स्वतःची गोप चित्रपट निर्मिती कंपनी ही काढली. त्यांनी आपल्या कंपनीतर्फे काही चित्रपट ही काढले.त्यांचे बंधू स्वर्गीय.राम कमलानी हे सुद्धा दिग्दर्शक म्हणून त्यांच्यासोबत होते.1950 दशकातील स्वर्गीय. गोप हे उत्कृष्ट कलाकार होते. आपल्या शेवटच्या चित्रपटात स्वर्गीय. कुंदन कुमार दिग्दर्शित तिसरी गल्ली या चित्रपटाच्या सेटवर, छायाचित्रणाच्या वेळेस,त्यांना एका मृत माणसाचा रोल करायचा होता. त्यामध्ये मै उपर जा राहू! असे संवाद होते.हा संवाद त्यांनी सेटवर म्हटला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन मुंबईत 1957 मध्ये वयाच्या 44 झाले.त्यांनी हिंदुस्थानी चित्रपटासाठी, केलेल्या निस्सीम सेवेला मनापासून सलाम.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *