
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,सध्या आपण दूरचित्रवाणी संच सुरू केल्यास आपल्याला, जवळ जवळ पाऊण तास सारखी सारखी एकच जाहिरात दिसते,दलित बंधू योजना तेलंगणा राज्य! मग सुरू होते योजनांच्या अंतर्गत लाभार्थीचे संभाषण. या योजने अंतर्गत मी छोटा कारखाना काढला. माझी परिस्थिती बिकट होती. मला सरकारने मदत करून मला माझ्यावर पायावर उभे केले.दुसरा म्हणलं मी एक बेकार तरुण होतो, नोकरीसाठी वणवण भटकत होतो, पण या योजनेच्या आधारे मी आज सक्षम झालो आहे. मग एक स्त्री येते आणि सांगते, माझ्या परिवाराचे दोन वेळचे जेवणाचे वांदे होते,पण सरकारच्या या योजनेच्या मदतीने मी आज चांगल्या परिस्थितीत जीवन जगात आहे. अरे!महाराष्ट्र राष्ट्रातील प्रगतीशिल राज्य आहे. आपण कसल्या ह्या जाहिराती दाखवून महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावर आणताय! कारण या असल्या लाभदायक योजना आपल्या महाराष्ट्रात आल्यावर, दलित समाज अधिक खुशाल जीवन जगतोय, त्याबरोबर इतरही बहुजन समाज जो पिछाडीवर आहेत,ते पण आता एकदम सुधारित आर्थिक समाधानाचे जीवन जगात आहेत. हे ऐकिवात नाही. मग कशाला महाराष्ट्राने ही चेष्टा चालवली आहे. ह्या योजना व त्यांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेने केव्हा घ्यायचा?आमच्या बाबांच्या भूमीत काय चाललं आहे?हे!जाहिरात पाहून लोकांच्या जळफळाट होतोय, खास करून दलित व इतर मागे मागे पडलेल्या समाजाच, कारण त्यासाठी ते अपेक्षित आहेत. मोर्चा काढत आहेत अनेक धडका आझाद मैदानावर व मंत्रालयावर देत आहेत. त्या जनतेला फक्त आश्वासनाशिवाय काहीच त्यांच्या पदरी पडलेले नाही. आज वाईट ह्या गोष्टीचा वाटतं की भारतरत्न व घटनेचे शिल्पकार माननीय. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.तर त्यांचे अनुयायी माननीय. प्रकाशजी आंबेडकर माननीय. आनंदजी आंबेडकर, माननीय रामदासजी आठवले सगळे महाराष्ट्राचे दलितांचे, राष्ट्रीय आघाडी नेते आहेत. त्यांच्या घरी दूरचित्रवाणी संच नाही असं वाटतं?की, त्यांना तो पाहण्यास वेळ नाही,अरे साहेबांनो आपण सदर जाहिराती पाहून पेटून उठले पाहिजे! आज जर छोटासा तेलंगणा राज्य दलितांचे कदर करतोय, मग विकसित महाराष्ट्र हे काम करत का करत नाही?आपण सगळे आमदार,खासदार आहात या गोष्टी आपण सरकारी केव्हा मांडणार? दलित बंधू योजना संपल्यावर.या जाहिराती दाखवून का जनतेच्या भावनांशी खेळताय. मी म्हणतो, आपण याच्यापेक्षा दलित व इतर मागे असणाऱ्या वंचित समाजासाठी मोठी योजना महाराष्ट्रात आणावी व दलित व इतर समाजाचे भले करावे. काल उगवलेला तेलंगाना आज इतक्या लवकर वंचितांसाठी काहीतरी करतोय, मग आपण का नाही?आपले दलित नेते फक्त राजकारणाच्या आट्यापाट्या खेळत बसले आहेत का? त्याला वंचित समाजाचे काय पडलेले नाही..असे जनतेच्या मनामध्ये वाटते,मात्र आपल्या पक्षाला वंचित आघाडी पक्षाचे नाव देता येते! वंचितांचे काय? एकंदरी रू.17 कोटी 75 लाखांची योजना आहे .तर सुरक्षा
.कवच म्हणून प्रत्येकी रू.दहा हजार हे दलितांना प्रथम भेट आहे. खरं तेलंगणा राज्य लहान आहे. महाराष्ट्र तर प्रगत आहे महाराष्ट्रासाठी ही रक्कम नक्कीच मोठी असायला हवी.कारण महाराष्ट्रात दलित वंचित समाज मोठ्या प्रमाणात आहेत. सध्याच्या सरकारला,असल्या जाहिराती पाहून त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत.आपण प्रगत महाराष्ट्राचे शिलेदार आहोत, मग आपण नको ते राजकारण करून महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलेला आहे? ते आधी पहा! कारण महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतर व विरोधला विरोध करायचा व जनतेच्या पैशांची उधळण करायची हेच फक्त चालेल आहे. वंचित समाज व जनता गेली भाडमध्ये. आपल व्यवस्थित चालेल ना ते पाहायचं.