प्रतिनिधी : प्रकाश जैस्वार

मुंबई, सफल विकास वेलफेअर सोसायटी या सामाजिक संस्थेला ला ऑल जर्नलिस्ट्स अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्याबद्दल संघटनेचा विशेष प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक 27डिसेंबर रोजी कोल्हापुरात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या वतीने कोविड काळात केलेल्या कार्याची दखल घेत ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल च्या वतीने संस्थेला हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल यांनी दिली आहे. सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या मुंबई, अध्यक्षा यांनी मेरी चेट्टी तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत आभार मानले तसेच संस्थेचे अध्यक्ष निसार अली सय्यद हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी कोल्हापूर ला जाणार असल्याची माहिती संस्थापक सचिव वैशाली महाडिक यांनी दिली आहे.