तरुणीची फसवणूक करणारा जिम ट्रेनर जेरबंद

Share

प्रतिनिधी :मिलन शाह

व्हिसाच्या नावाखाली तरुणीची फसवणुक करणाऱ्याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. किरण मांडवकर असे त्याचे नाव आहे, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे

    तरुणी ही कांदिवली परिसरात राहते वजन कमी करण्यासाठी तिला एका पर्सनल ट्रेनरची गरज होती. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख किरणशी ओळख झाली होती, त्याच दरम्यान तिने आपल्याला कॅनडा येथे जायचे असल्याच किरण ला सांगितले. तेव्हा किरण ने आपली ओळख असल्याचे सांगून तिच्याकडून २० लाख रुपये घेतले

   पैसे घेतल्यानंतर किरण हा व्हिसा न देताच पळून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण विरोधात गुन्हा दाखल केला

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिदे यांच्या पथकातील डीओ सपोनि भगत,पोह कोलासो  व पथकातील पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलीसना किरण ची माहिती मिळाली

    त्याला पोलीसांनी वेषांतर करून जिमचे प्रोटीन्स विकणारे असल्याचे भासवून पुणे येथून शिताफीने अटक केली

     फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे

     सदर आरोपी सराईत असून त्याचेवर कळवा पोलीस ठाण्यात चिटींगचे गुन्हे नोंद असून तीन महीने जेलमध्ये राहून आला आहे

त्याने अजून फसवणूक केली आहे अथवा तो स्टिओराईड्स विकायचा का याचाही तपास पोलीस करत आहेत


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *