
प्रतिनिधी:कांचन जांबोटी
पनवेल:ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार
सन्मा.गणेश कोळी तर केंद्रीय सचिव पदी ज्येष्ठ पत्रकार
बाळकृष्ण कासार यांची निवड आज विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या सभेत करण्यात आली..निवडीची घोषणा
संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी केली. या वेळी मोठया संख्येने पत्रकार सदस्य उपस्थित होते. गणेश कोळी संस्थेच्या स्थापने पासून संघटनेशी जुळले असूनसंघटनेत वेळोवेळी अनेक पदे भूषवली तसेच मधुर भाषी मन मिळावू वृत्तीचे गणेश कोळी हे पनवेल टाइम्स चे संपादक आहेत.त्यांच्या नियुक्ती ने संघटने ला अधिक मजबुती मिळणार .त्यांच्या नियुक्तीचे स्वागत सर्वच थरातून होत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस सफल महाराष्ट्र समाचार आणि AJFC मुंबई अध्यक्ष निसार अली यांनी त्यांची AJFC च्या केंद्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती चे स्वागत केले आहे.
Congrats