प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,लायन्स क्लब ऑफ मुंबई मॅजिक , कांदिवली चे अध्यक्ष लायन तर्नेजा परब यांनी पुढाकार घेत.वसईच्या 22 वर्षाच्या रिचा सिंग या तरुणीला एक कृतिम पाय देत, सामाजिक बांधिलकी जोपसली आहे. बेताची परिस्थिती असलेल्या रिचा सिंगला कृत्रिम पाय मिळताच सर्वोच्च आनंद झाला. मी आपले सहकार्य आणि उपकार कधीच विसरू शकणार नाही..!!. असे भावोदगार रिचा ने काढले.
वसईच्या 22 वर्षाची रिचा सिंग ह्या तरुणीचा एक पाय चुकीचा औषधोपचारामुळे, कायमचा गमवावा लागला. आर्थिक परिस्थितीमुळे तिला कृत्रिम पाय बसवण शक्य नव्हते. या बाबत माहिती मिळताच कांदिवली चारकोप येथील लायन्स क्लब ऑफ मुंबई मॅजिक , कांदिवली चे अध्यक्ष लायन तर्नेजा परब यांनी रिचाला पुन्हा स्वतचा पायावर उभं करायचं ठरवलं. सदर कार्यात लायन तस्निम हरियानावाला तसेच लायन्स क्लब ऑफ महावीर नगर यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली.
17 ऑगस्ट ला अंधेरी येथील ऑर्थॉलिंब मध्ये डॉ. सौरभ सपकाळ यांनी तिला कृत्रिम पाय बसवला.ह्यावेळी मुंबई मॅजिकचे अध्यक्ष लायन तर्नेजा परब, लायन तस्निम हरियानावाला ( GFA Humanitarian), लायन सोनल शृंगारपुरे , लायन्स क्लब ऑफ महावीर नगर चे पीडीजी लायन शशिकांत मोध व लायन निमेश शाह उपस्थित होते. रिचा सिंग आणि तिच्या वडिलांनी सगळ्यांचे आनंदाश्रु भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून आभार मानले.
लायन तर्नेजा परब अध्यक्षा लायन्स क्लब ऑफ मुंबई मॅजिक-
अवघ्या 22 वर्षीय तरुणीला एक पाय गमवावा लागला, पुढे आयुष्य कसे काढणार,? या प्रश्नाने वेड लावले. पुढाकार घेतला आणि रिचाला तिच्या पायावर उभे करायचे असा निश्चय केला. सर्वांच्या सहकार्याने रिचा स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि डोळ्यांचे पारणे फिटले.
