
प्रतिनिधी :सुरेश बोरले
जेव्हा माणूस कोणत्याही क्षेत्रात पारंगत असतो किंवा विशारद असतो, थोडक्यात मास्टर असतो. त्यावेळेस त्याला लोकांनी त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवल्याबद्दल पदवी दिलेली असते. हे त्यांनी केलेल्या मेहनतीच फळ असते. पण कालांतराने त्यामध्ये जर खंड पडला, मग त्याची तारांबळ उडते. हा प्रकार प्रत्येकाच्या जीवन कालखंडात येत असतो. या परिस्थितीतून त्याला बाहेर निघताना, अनेक प्रकारची तारेवरची कसरते करावी लागते. कारण तो जरी संकटात असला, तरी लोकांची अपेक्षा त्याने त्याही परिस्थितीत पूर्ण करावी अशी असते, म्हणून त्याला लोकाग्रस्त पदवी दिलेली असते. हा खडतर प्रवास समाजाच्या कला, क्रीडा व समाजसेवेत येत असतो. खास करून क्रीडा क्षेत्रात जेव्हा अशी परिस्थिती होते त्यावेळेस त्या खेळाडूचे भवितव्य धोक्यात असते. एका चांगल्या खेळीची,तो अपेक्षा करतो, पण त्याला खेळीला सूर सापडत नाही. हा प्रकार क्रिकेटमध्ये, अनेकांनी भोगलाय. त्यामध्ये सर सुनील गावस्कर सर रिचर्ड हेडली, सर विवियन रिचर्ड क्रिकेटचा देव भारताचा, भारतरत्न सचिन तेंडुलकरने ही हा प्रवास भोगलाय! हे विशेष. आपल्या बॅटीतून धावा होत नसतात.काही वेळ तो खेळाडू स्वतःच बाद होतो,० वर बाद होतो,त्रिफळाचीत होतो, धाव बाद होतो, यष्टिचित होतो.पायचीत होतो. कारण एकच की, धावा व मनासारखा खेळ न होणे. मानसिक तणाव असतो. याच गोष्टीचा व समस्येचा शिकार होतोय तो, भारतीय क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्मा!”हिटमॅन”!. सध्या आय पी एल मध्ये एक ते दोन वेळा वगळता, त्याचा खेळ बहरलेला नाही.तो सध्या बॅड पॅच मधन चाललेला आहे. आपली नैसर्गिक खेळी करण्यात तो अपयशी ठरतोय. म्हणजे बॅड बॅचचा शिकार होतोय.या सगळ्या प्रकारात टीटीपी टाईम टेंपरामेंट परफेक्शन व आत्मविश्वास या गोष्टींचा सहयोग लागतो, तो होत नाही. कारण मानसिकता ही अडचण असते. खेळात समरस होणे आवश्यक आहे. कारण अति खेळाने तो संयम राहत नाही. तर मोठी अडचण खेळाडूची होते.वाढते वय, शारीरिक झीज,शारीरिक व्याधी या गोष्टी आल्याचं. कारण जगात प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. त्यामध्ये शारीरिक मर्यादा ही अतिशय महत्त्वाची आहे. मग त्यावर उपाय काय तर या समस्ये पासून काही काळ दूर राहणं व पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करणं. कारण त्याच त्याच गोष्टी करून करून मनाला वीट आलेला असतो.काय तर ही एक साडेसातीच असते. त्यातून सुखरूप बाहेर पडायचे असते? हेच रोहित ने केले पाहिजे! त्याने थोडे दिवस शांत विश्रांती घेऊन अज्ञातवासात जावे. मग योगासन व व्यायाम करून पुन्हा ताजे तवाने होऊन त्याने सुरुवात जोमाने करावी.कारण राष्ट्रीय संघाचा कप्तान म्हणून त्याला आणखी बरेच सामने खेळायचे आहेत. याची जाणीव त्याल ठेवावी लागेल. शिवाय हिटमॅन म्हणून आपली परंपरागत शैली कायम ठेवायची आहे. म्हणून लोकांची मने जिंकायची आहेत. त्यामुळे सध्या क्रिकेट पासून त्याने काही काळ दूर राहणं चांगलं. पण पैसा कमवायचं हेच क्षण असतात, पण त्यावेळी आपलं शरीर व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचं आहे. आपण आपलं शरीर व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही चांगला पैसा कमावू शकता. रोहित शर्मा ने तरी हे जपायला हव! सर सलामत तो पगडी पचास! याचा प्रत्यय लक्षात रोहित ने ठेवायला हवा. काही दिवसापूर्वी जेष्ठ व श्रेष्ठ खेळाडू संनी गावस्कर यांनी असाच सल्ला दिला होता रोहितला, क्रिकेट पासून दूर राहाव आणि आराम करावा.अशी महान व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करते, त्यावेळेस त्यांच् ऐकायचे असते.त्यांचा अनुभव हा बोलतो. कालाच झालेल्या सामन्यात 1983 चे विश्व चषक प्रतिनिधी सँडी उर्फ संदीप पाटील यांनी एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे सर सुनील गावास्कर बद्दल विचारली असता,ते कसे मानसिकतेवर ताबा ठेवायचे? त्याची माहिती त्यांनी अशी दिली. सामन्यात फलंदाजीला सुरुवात करण्यापूर्वी ड्रेसिंग रूम मध्ये ते कोणाशी बोलत नसत.फक्त हाताने इशारे करून काय पाहिजे ते सांगायचे. पाणी जरी पाहिजे असेल तरी ते हाताने इशारा करायचे. केवढी मानसिकता व समरसता कसोटी सामन्यात गावस्करांनी ठेवली, याचे एक मूर्तीमंत उदाहरण. शिवाय त्याची फलंदाजी संपली की कधीच बाहेर बसून सामना पाहायला यायचे नाहीत. ड्रेसिंग रूम मध्येच आपल आवडत पुस्तक वाचत बसत.वाचन करीत असत.त्यांनी एवढी तपश्चर्या केली म्हणून ते आज महान आहेत. प्रत्येक मानकरांच्या मागे काहीतरी इतिहास आहे. म्हणून ते थोर आहेत.याचा प्रत्यय रोहितने आपल्यात आणायला हवा. परत नव्या जोमाने, ह्या हिटमॅनने सुरुवात करावी हीच अपेक्षा!.