
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई,राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी जाहीरपणे हातपाय तोडण्याची भाषा केली तर दुसरे आमदार संजय बांगर यांनी शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करताना महाराष्ट्राने पाहिले. या दोन्ही आमदारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात बोलताना हातपाय तोडा नाही तर तंगडी तोडा अशी प्रभोभक भाषण केले. ही भाषा कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभणारी नाही. आमदार प्रकाश सुर्वे यांनी जाहीरपणे धमकी दिलेली आहे. तर दसरे आमदार महोदय संजय बांगर यांनी शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केली. हे दोन्ही प्रकार सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याचे प्रकार आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास हे दोन्ही प्रकार आणून दिले तरीही या घटनांचे समर्थन करत नाही असे म्हणून दोघांनी आमदारांच्या दादागिरीवर पांघरून घालण्याचे काम केले आहे. आमदार संजय बांगर यांना मुख्यमंत्री यांनी समज दिल्याचे प्रसार माध्यमातून समजले पण हे पुरेसे नाही. दोन्ही आमदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी असे कृत्य केले असते तर आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई केले असती पण स्वतःच्या पक्षातील आमदारांच्या कृत्यांवर पांघरून घालणे योग्य नाही. त्यामुळे या दोन्ही आमदारांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी असेही राजहंस म्हणाले.