
प्रतिनिधी:सुरेश शेलार
पालघर, रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुमारे 2 हजार 250 महिलांच्या उपस्थितीत झड़पोली येथील ‘जिजाऊ’ या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांच्या घरी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला.
रक्षाबंधनानिमित्त उपस्थित महिलांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांना राखी बांधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी पालघर, ठाणे येथील 600 हून अधिक आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, परिचारिका आदी नीलेश सांबरे यांना राखी बांधण्यासाठी गेले होते. मोठा भाऊ असल्याच्या भावनेतून त्यांनी प्रत्येक बहिणीच्या सुरक्षेची ग्वाही दिली. हा रक्षाबंधन सण आणखी तीन दिवस मोठ्या उत्साहात सुरू राहणार आहे.
निलेश सांबरे (आप्पा) हे समाजसेवक तर आहेच पण त्या बहिणींच्या भावापेक्षाही जवळचा आहे. प्रत्येक वेळी दिवाळीला भैय्या दूजला त्यांना पैठणी साडी देतात. जिजाऊ एज्युकेशनल सोशल सोसायटीचा कृतज्ञता उपक्रम हा आता पालघर-ठाणे जिल्ह्यासाठी पारंपरिक कार्यक्रम बनला आहे. समाजातील सर्व स्तरातील महिला नीलेश सांबरे आणि त्यांचा मुलगा धीरज निलेश सांबरे यांच्या घरी हजारोंच्या संख्येने राखी बांधण्यासाठी येतात, पण त्याही जिजाऊंच्या अनेक केंद्रांना भेट देऊन रक्षाबंधन साजरे करतात.
