
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,विलेपार्ले पूर्व येथील प्रख्यात पार्ले टिळक विद्यालयात,आसाम रेजिमेंट व शाळेच्या विद्यमाने!भारतीय सैन्यात वापरात असलेली, आधुनिक शास्त्रांचे प्रदर्शन व प्रत्याक्षिके दि.6 व 7एप्रिल,2024 रोजी, विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. सदर प्रदर्शनात आर्टीलरी तोफा,विविध प्रकारच्या आधुनिक बंदुका,लहान बॉम्बस,रडार, दुर्बिणी,जमिनी वरून हवेत मारा करणारी शस्त्रे याची माहिती व प्रात्यक्षिके आणि प्रदर्शन,तसेच प्रत्येकाला वैयक्तिक शस्त्र हाताळणी संधीही ,आसाम रेजिमेंटच्या जवानांनी उत्तमरित्या उपलब्ध करून दिली.शिवाय जंगलातील कमांडो प्रशिक्षणासाठी,लागणारे प्राणी पकडण्याचे चाप कसे बनवतात,याचेही प्रतक्षित सैनिकी वेशेत दाखवले.सदर प्रदर्शनास मुंबईतील नागरिकांनी व अनेक महाविद्यालयीन छात्र सेनेच्या जवानांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.ह्या आयोजनासाठी शाळा प्रशासन व आसाम रेजिमेंट तुकडीचे,सर्वांनी प्रशंसा केली,हे विशेष!