
फोटो :प्रदीप खरात आमदार कपिल पाटील अनिता खरात पुरस्कार स्वीकारताना.
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
राज्यभरातील शिक्षकांकरिता कार्यरत असलेल्या ‘शिक्षक भारती’ या संघटनेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिलांना “सावित्री फातिमा पुरस्काराने” सन्मानित करण्यात येते. यावर्षाचा “सावित्री फातिमा आदर्श शिक्षकेतर पुरस्कार 2024″ अनिता प्रदीप खरात यांना आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते आज रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. अनिता खरात या युसूफ मेहरअली विद्यालय, ताडदेव मुंबई. या मराठी माध्यमाच्या शाळेत गेली 25 वर्षे कार्यरत आहेत. याखेरीज त्या इतरही सामाजिक व शैक्षणिक संस्थांसोबत सक्रिय जोडल्या गेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक बेलसरे उपस्थित होते.