
प्रतिनिधी उत्कर्ष बोरले
मुंबई, देशात मुलींची पहिली शाळा सुरु करणारी सावित्री माई फुले यांच्या जयंती निमित्त मालाड काचपाडा नंबर 1 या तमीळ वस्तीत घरा घरात रांगोळी काढून दिवे लावून सावित्री उत्सव 2023 उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्र सेवा दल, काचपाडा, सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि सावित्री माई चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दिनांक 3 जानेवारी रोजी काचपाडा नंबर 1येथे सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ महिला दिवाली पटेल आणि तरुणी अनु काऊंडर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच प्रसंगी राष्ट्र सेवा दल, मालवणी टीम च्या वतीने सावित्री माई ला नृत्या द्वारे शिक्षणाचा महत्व उपस्थिता समोर सादर केले.बंदोबस्त साठी आलेले पोलीस कर्मचारी प्रवीण भालेराव यांनी देखील उत्स्फूर्त पणे आपले मत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांनी ही मार्गदर्शन करत सावित्री बाईच्या कार्याचा उलघडा केला.सावित्री माई फुले चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष लालजी कोरी यांनी शिक्षणाचं महत्व आणि विकास यावर मत मांडले सफल विकास वेलफेअर सोसायटी चे अध्यक्षा निसार आली यांनी मार्गदर्शन करत मुलगा, मुलगी चा भेद करू नये तसेच दोघांना सामान शिक्षण व वागणूक द्यावे असे मत व्यक्त केले. राष्ट्र सेवा दल,काचपाडा अध्यक्षा मेरी चेट्टी व नमिता मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या सचिव वैशाली महाडिक यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात महत्वाची भूमिका निभावली.

कृष्णा वाघमारे ,, लक्ष्मी काऊंडर, शशी गुप्ता मनोज परमार, अनिता महात्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत केली.मुर्गन पिल्लई यांनी सूत्रसंचालन केले तसेच वैशाली महाडिक यांनी सर्वांचे आभार मानले प्रसंगी सेवा दल गोरेगाव शाखा अध्यक्ष मनोज खराडे,
राजकुमार डिलोड,रामचंद्र रजक,आनंद सारसर, गुलाब चांडलिया, सुरजभान लोहट,संजु तुसांबड, राजू सौदा व इतर पदाधिकारी ककर्यकर्ते आणि स्थानिक महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
