
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,एकेकाळी महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप नेते आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी त्या वेळी केलेल्या वक्तवयाची चर्चा सोशल मीडियावर जोमाने सुरु आहे.त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळचे मवीआ चे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांच्या बाबत वक्तव्य केले होते कि नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील तर, मग हेच म्हणावे लागेल कि हे सरकार दाऊद इब्राहिम ला समर्पित आहे. असं वक्तव्या देवेंद्र फडणवीस यांनी केले होते मात्र सद्या महायुतीचे महत्वाचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटा कडून नवाब मलिक सह त्यांची मुलगी सना मलिक यांना ही विधानसभेची महायुती कडून उमेदवारी दिली असल्याने देवेंद्र फडणवीस ट्रोल होत आहेत तसेच भाजप च्या तंबूत ही या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे..