सदाबहार अभीनेत्री,कामिनी कौशल!

Share

File Photo
प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,बालपणीच्या कृष्णा धवल चित्रपटांचा जमाना आठवतो.तो फिल्मी दुनियेचा सुवर्णयुग होता.अनेक नट नट्यांनी आपली अदाकारी पेश
केली.त्याकाळी महिलांनी चित्रपटांतून कामे करणं,हे तूच्छ , घृणास्पद व असामाजिक असे समजले जायचे..तरीही त्या जमान्यातील अशा रुडी चाली रीती सोडून ,चेहऱ्याला रंग फासून,लोकांचा रोष अंगावर घेऊन,अभिनय जगतात आपला ठसा त्या महिला कलाकारांनी उमटवला.त्यात त्या यशस्वीही झाल्या.त्यामध्ये दिसायला नाजूक व त्याकाळी बी.ए.शिकलेली,हिंदी सिनेमात एखाद्या बाहुली प्रमाणे तीची अदा!अशी ही सदाबहार अभिनेत्री !कामिनी कौशल!ह्यांच्या बद्दल थोडी माहिती घेऊया.
कामिनी कौशल, ह्या पुर्वश्रमीच्या उमा कश्यप.त्यांचा जनम 24 फेब्रुवारी,1927 साली पाकिस्तानी लाहोर येथे झाला.त्या त्यांच्या परिवारात हे लहान आपत्य.त्यांचे वडील स्व.राम कश्यप हे जीवशास्त्र विभागात,बोटनी ह्या विषयाचे प्राध्यापक होते.हा विषय शिकवताना त्यांनी 6 झाडांच्या जाती निर्माण केल्या.त्यांचं निधन 26नोव्हेंबर 1934 साली झाल.त्यावेळेस त्या फक्त 7 वर्षाच्या होत्या.मग त्या बी ए झाल्या व इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होत,त्यांचं शिक्षण लाहोरेलाच झाल.बालवयातच त्यांना आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली.त्यांचं वकृत्व चांगल होत. त्या सोबत त्या पोहणे,घोडेस्वारी,स्केटिंग आदी खेळात पण पारंगत होत्या.त्यांना ₹10रुपये खर्चाला मिळायचे.त्यांच्या मोठ्या बहिणीच्या अचानक अपघाती निधन झाले.मग त्यांनी आपल्या विधुर बहिणीच्या पतीशी विवाह केला.कारण बहिणीच्या दोन मुलांना सांभाळायचे होते.बी.एस. सूद त्यांच्या पतीचे नाव.1955साली लगना नंतर,त्यांच्या पासन आणखी 3 आपत्ये झाली. सूद हे बीपीटी त अभियंता होते.त्या मुंबईला स्थायिक झाल्या.तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयीन नाटकात कामे केली होती.शिवाय आकाशवाणीवर कामे केली होतीच.सुशिक्षित घरण्यातून असल्याने,त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की आपण सिनेमात काम करू!जवानाच्या मदतीसाठी,महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळेला स्व.अशोक कुमार व लीला चिटणीस,हे प्रमुख पाहुणे होते.मग शिफारशी वरन त्यांनी,1946 सली स्व.चेतन आनंद. ह्यांनी,त्यांनां” नीच्या नग्रे ” ह्या चित्रपटात मुख्य महिला कलाकार म्हणून काम दिले.येथे त्यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.उमाच! कामिनी हे नाव त्यांनीच दिलं.हा चित्रपट चांगलाच चालला.त्याला मोंट्रीयल महोत्सवात पारितोषिकही मिळाले.मग त्या गुरू टि.के.
महाली यांच्या कडून,भारत नाट्य मही शिकल्या.,1948 साली जे जे आघाडीचे नट होते,त्यामध्ये स्व.अशोक कुमार,दिलीप कुमार देवानंद,राज कपूर सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर,त्यांनी कामे केली.1946 साली लता दीदी जिद्दी मध्ये त्यांच्यासाठी,पहिल्यांदा गायल्या. नाहीतर त्यांनी पार्श्व गायन ,स्व.शमशाद बेगम,सुरीदर कौर ह्यांच्या कडून केले होते.विषेश म्हणजे,त्या तबकडीवर दीदीन नाव नव्हत.पण विशेष म्हणजे कमिनिंच नाव होत.मग1965 साला नंतर,वयाच्या मानाने,त्यांनी चरित्र अभिनेत्रींची कामे केली.ते चित्रपटही छान चालले.युसुफ खान अर्थात, दिलीप कुमार त्यांच्या प्रेमात पडले होते.पण घरंदाज स्त्री!म्हणून त्यांनी त्यांना स्पस्ट नकार दिला.कारण ही चंदेरी दुनिया आहे.येथे कोणी कुणाच्या प्रेमात पडू शकते.अश्या त्या म्हणाल्या होत्या.कमिजिनी फिल्मी दुनिया तर गाझवलीच,पण 1972 साली दूरचित्रवाणी प्रवास सुरू केला.त्यात त्यांनी लहान मुलांसाठी, अनेक उपयोगी कार्यक्रम केले.लहानांसाठी “पराग”मासिकातही लिहिले.त्यामधे बॅटी,छोटा भाई,मोठा भाई ही पात्रे अनेक वर्षे गाजली.त्यांची चांद सितारे ही मालिकाही गाजली.1986 ला मेरी परी ही अनिमेशन फिल्मही बनवली.1984 साली जेवल इन क्राऊन!मालिकेत शालिनी मावशीची भूमिकाही गाजली.ती मालिका सरस ठरली.तर स्टार प्लस्वर शामो की दिदी त्यामध्ये शामोच्या आजी ही त्यांनी छान पश केली.मग अधिकारी ब्रस.चया वक्त की रफतार ह्या दिल्ली दूरदर्शनवरील त्यांनी काम केले.एकंदरीत पाहता त्यांच्या कलेची अदाकारी ही अष्टपैलू होती.हे भाग्य सगळ्यांना लाभत नाही.ते कामिनी कौशल ह्यांना लाभले.अर्थात हे मेहनतीचे फल आहे.
त्यांना मिळालेली पारितोषिके!
1956….उत्कृष्ठ कलाकार.
1967…..उत्कृष्ठ सहायक कलाकार.
2013…..कल्पना चावला पारितोषिक
2015…..फिल्म फेअर आजीवन पुरस्कार!
अशा ह्या बहुआयामी अभिनेत्रींनी,त्यांनी दिलेल्या कलेच्या महान योगदाना बद्दल,त्यांना मानाचा मुजरा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *