संविधान परिवारची ग्रीन वारी 🌳

Share

 प्रतिनिधी :वैशाली महाडिक 
इचलकरंजी :आषाढी एकादशी आणि मोहर्रमच्या दिवशी आम्ही संविधान परिवारचे कार्यकर्ता यांनी इचलकरंजी शहर परिसरात वृक्षारोपण केले. 
   संत तुकाराम महाराज सांगून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे🌿 ही एक अभंगाची ओळ आपण जगण्याचा प्रयत्न केला तरी आपले आयुष्य समृद्ध होवू शकते, या विश्वासाने दर आठवड्याला ही तरुणाई वृक्षारोपण करत आहे. 
    साने गुरुजी 125 अभियानानिमित्त 125 झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करणेकामी यावेळी वृक्षमित्र निलेश बनगे, संघटक रोहित दळवी, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे, संवेदनाचे दामोदर कोळी, वैभवी आढाव, विनायक होगाडे, आदिरा आणि संजय रेंदाळकर आवर्जून उपस्थित होते. आज झाडे लावताना भागातील नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *