
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात अहिंसा, व्हीगन वाद आणि मानवतावाद या विषयावर आचार्य प्रशांत यांच्या सोबत ‘वाय व्ही केअर’तर्फे ‘मीट इन मुंबई’ कार्यक्रमाचे आयोजन वाय.व्ही.केअर संस्थेच्या वतीने संस्थापक विघ्नेश मंजेश्वर यांनी केले होते.

आचार्य प्रशांत आणि विघ्नेश मंजेश्वर यांच्याशी आयोजित केलेल्या या संवादात ‘करुणा’ हा विषय उपस्थित होताच चर्चा अधिक खोलवर झाली. आचार्य यांनी सहभागींना अंतर्मुख होण्यासाठी प्रोत्साहन देऊन संकुचित विश्वासांना आव्हान देण्यासाठी प्रोत्साहित केले. अनेक मुद्द्यांवर चर्चा करून त्यांच्या परस्परसंबंधित मुद्द्यांचा गाभा घेऊन त्यांनी व्हीगन वादाचा गाभा स्पष्ट केला.
प्रशांत अद्वैत’चे संस्थापक आचार्य प्रशांत अद्वैत हे केवळ वेदान्ताचे अभ्यासकच नाहीत, तर सुशिक्षित शिक्षक आणि लेखकही आहेत,’ असे मत डिस्कव्हर ऊर्जा दातव्या ट्रस्टचे संस्थापक विघ्नेश मंजेश्वर यांनी व्यक्त केले. देश-विदेशातील अनेक संस्थांमध्ये त्यांचे नियमितपणे व्याख्यान होतात. त्यांच्या प्रेरणादायी सत्रांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवनात अभूतपूर्व सकारात्मक बदल घडून आले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा देणारे विघ्नेश मंजेश्वर सांगतात की, चांगल्या लोकांना जोडणे हा संस्थेचा उद्देश आहे, त्यामुळे ते असे कार्यक्रम करत राहतात. आपल्या खान-पानआणि राहणीमान या बाबी पृथ्वीचा नाश करत आहेत. वेगनवादाच्या माध्यमातून कमीतकमी हिंसाचार होईल असे नाते आपण विश्वाशी जोडू शकू.
