
प्रतिनिधी:सुरेश बोरले
शिवसेना फुटीर गटाने काही दिवसांपूर्वी,एक वादादित पोस्टर तयार केल व प्रसारित केल.त्या पोस्टरमध्ये, काही त्रुटी होत्या,ह्याच त्रुटी!आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना, भारी पडत आहेत.ह्या त्रुटी चुकून जाल्या की मुद्दाम त्या दाखवण्यात आल्या?हा मोठा प्रश्न आहे!नुकत्याच पलघरच्या एका कार्यक्रमात, माननीय, मुख्य.मंत्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हे दोघं एकाच व्यासपीठावर आले होते.एक जुना सिनेमा मुंबईचा जावई मधील, कारे दुरावा,कारे अबोला,अपराध माझा असा काय झाला?हे गीत आठवल.हे दृश्य दूरचित्रवाणीवर,पाहून जाणवलं.कारण दूरचित्रवाणीवर,हा प्रसंग सारखा दाखवीत होते.ह्या दृष्यामध्ये दोघांची देहबोली ही अगदी नाराजीची दिसत होती.कारण अर्ध्या हळकुंडाने,पिवळे झालेले मुख्य शिवसेनेचे ४० फुटीर आमदार!आपल्या पंखाखाली आले त्यामुळे,त्यामुळे त्यांचे हात आता आभाळाला लागले आहेत, असं त्यांना वाटू लागलेलं आहे. आभाळ त्यांना ठेंगणं वाटायला लागले आहे.पण जेव्हा जेव्हा, विश्वात ‘ग’ निर्माण झाला,तेव्हा ते सगळे, नेस्तनाबूत झालेले आहेत.दैत्य प्रमुख लंकापती रावणा ला ही ग ची बाधा झाली होती, म्हणून रामायण घडले.कौरवांनी पांडवांना ध्युत खेळामध्ये, शकुनी मामाने हेरा फेरी ने हरवलं,तेव्हा त्यांनाही ग ची बाधा झाली,म्हणून महाभारत घडले.मग आता हि तर कलियुगातली माणसं आहेत. कुटुंबामध्ये जेव्हा नवरा बायको संबंध असतात तेव्हा, वातावरण पण कौटुंबिक असावे लागते. नाहीतर फारकत आहेच. नाहीतरी सध्याच्या युगात, आपण कुणाशी गद्दारी केली, कोणाच् वाईट केल,हे सगळ येथेच आपल्या डोळ्यासमोर भोगायचे असते. हा निसर्गाचा नियम आहे. ह्या प्रकरणाने शिंदे गट शिवसेना व भाजपामध्ये मिठाचा खडा पडला आहे,हे खर आहे. एखाद्या वेळेस ही शाब्दिक चकमक भाषा चालली असती. परंतु जेव्हा लिखाणा मध्ये कुठे चूक झाली व मित्रपक्षाला त्याची हानी पोहोचत असेल, तर काडीमोड नक्की होऊ शकते.लिहिलेला प्रसंग मनपटलावरन लवकर जाणार नाही. एक छोटीशी चूक आहे.तर यापुढे असे लिखाण करताना,कुठे चूक झाली तर काडीमोडी पक्की आहे. कारण पालघरच्या त्या दोघांच्या देहबोली मध्ये हे जाणवत होतं ही दूभंगीत मने, थोडीशी रक्त बंबाळीत आहेत.
यापुढे मोठी जखम झाली, रक्त धोधो वाहू लागलं किंवा समोरचा पक्ष अपमानित झाला, तर नक्कीच पुढे धोका आहे,हे नीच्छित. माननीय मुख्यमंत्री आपल्या भाषणात मोठ्या आवेशाने बोलले, की ये जोड है! मजबूत फेविकॉल का जोड है! कभी टूटे गा नही!हे तुम्ही कोण ठरवणार? हे ठेवणार येणारा काळ व जनतेचा कौल?कितीतरी मोठे सुरमा या राजकारणाने गिळंकृत केलेले आहेत. तुम्ही आम्ही कोण? त्यामुळे लाव हळद हो पिवळी! असं करून चालणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी यापुढे पोस्टरबाजी करताना काळजी घ्यावी, हे महत्त्वाचे आहे. पोस्टरबाजी करताना, जाहिराती करताना, ती अनेकदा गाळून पहावी लागेल, नाहीतर, पुन्हा काहीतरी विपरीत घडू शकते. एकंदरीत या पोस्टरबाजीमुळे भाजपमध्ये नाराजी नक्की आहे. कारण या विषयावर रोज कोणी ना कोणी नेता भाजपाचा बोलत आहे, हे युतीसाठी बरोबर नाही. म्हणजेच ही पोस्टरबाजी,भारी त्यांच्या जिव्हारी लागलेली आहे. हे विसरून चालणार नाही.