
प्रतिनिधी :कांचन जांबोटी
मुंबई, महापालिकेचे एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांना गोवा येथे झालेल्या हाफ ट्रायलोथॉन स्पर्धेत “गोवा आयन मॅन 70.3 “या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत त्यांनी 1.9किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21 किमी धावणे हे सर्व एकत्रितपणे त्यांनी 7 तास 29 मिनिटात पार केले.
मोटे हे महापालिकेतील उत्साही आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. रोजचा व्यायाम, सायकलिंग आणि पोहणे तसेच धावणे हे प्रत्येकाने केल्यास आपले आरोग्य उत्तम राखता येईल अशी प्रतिक्रिया मोटे यांनी दिली.
मोटे यांनी 2017 साली “टाटा ड्रीम रन” मध्ये सहभाग, 2018 मध्ये टाटा हाफ मॅरेथॉन, 2019 टाटा फुल मॅरेथॉन व गोवा ट्रायलोथॉन पार करून त्यांनी नवा विक्रम जोडला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.