
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभागातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनात शेठ एन. एल. हाय स्कूल , मालाडने -विषय -आरोग्य अंतर्गत लहान गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले .पी वार्ड विज्ञान प्रदर्शन आणि सहशालेय उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम पारितोषिक ( गुजराती माध्यम ),निबंध स्पर्धा लहान गट प्रथम पारितोषिक (गुजराती माध्यम), मोठा गट द्वितीय पारितोषिक (गुजराती माध्यम), प्रश्नमंजुषा स्पर्धा लहान गट प्रथम पारितोषिक (हिंदी माध्यम),वक्तृत्व स्पर्धा लहान गट द्वितीय पारितोषिक (हिंदी माध्यम) आणि निबंध स्पर्धा लहान गट (हिंदी माध्यम)द्वितीय पारितोषिक पटकावले . सदर पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. अमी देसाई मॅडम यांनी अभिनंदन केले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. विज्ञान प्रदर्शनात शाळेने यशस्वी कामगिरी केल्याबद्दल एम. के. ई. एस. संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आले व भविष्यात आपली शाळा विभागात नव्हे तर मुंबईत प्रथम क्रमांकाची शाळा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.विज्ञान प्रदर्शन सांगता सोहळ्यात सौ. अमी देसाई मॅडम यांनी कार्यक्रमाचे खूप छान सूत्रसंचालन केल्याबदद्दल संस्थेने त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. सदर माहिती सहायक शिक्षक श्री लालजी कोरी सर यांनी दिली.
