
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,पर्यटन स्थळे ही लोकांसाठी असतात!.मुंबई चे समुद्र किनारे हे पर्यटक स्थळे आहेत.तसाच एक समुद्र किनारा अंधेरी वेसावे येथे लोकांना लाभलेला आहे.येथे लोक संध्याकाळी सुट्टीच्या दिवशी कुटुंबा समवेत येत असतात.पण येथे किनाऱ्या लगतच अनेक अनधिकृत झोपड्या वसलेल्या आहेत.येथे त्या झोपडीत राहणारी लोक मलमूत्र उघड्यावरच करतात.त्याशिवाय घोळक्याने येथे दारू,चरस, गांजा ,ब्राऊन शुगर आदी नशा करीत असताना आढळतात .हे मेरी टाईम,
बी पी टी तसेच समुद्र किनारा पोलिसांना माहीत नाही का?किंवा पालिका कर्मचाऱ्यांना ठाउक नाही का?येथील येणारे पर्यटक त्रस्त आहेत.या ठिकाणी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.