प्रतिनिधी :मिलन शह
लाडक्या मित्रांसाठी वक्फच्या जमिनी बळकावण्याचा भाजपा सरकारचा डाव.
नवी दिल्ली:
वक्फ (सुधारणा) विधेयक म्हणजे आगामी काळात सर्व धर्मांसाठी एक धोक्याची घंटा आहे. आज मुस्लिम समाजात भाजपा सरकारने ढवळाढवळ केली आहे पण उद्या हिंदू, शीख, पारशी धर्मांच्या व्यवस्थापनातही हे सरकार ढवळाढवळ करणार. भाजपा सरकारला जमिन, मतदान प्रक्रिया इतर पक्ष किंवा धार्मिक संस्था असो, सर्व ठिकाणी आपला हस्तक्षेप आणि दबदबा निर्माण करायचा आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आपल्या राज्यघटनेने प्रत्येक धर्माला त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक स्थळांचे आणि चालीरीतींचे रक्षण करण्याचा समान अधिकार दिलेला आहे. वक्फ विधेयक हे घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यावर आधारित आहे, पूर्णपणे असंवैधानिक आहे. आपल्या लाडक्या मित्रांसाठी वक्फच्या जमिनी बळकावण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. या विधेयकावरून भाजपा सरकारचा अल्पसंख्याकांच्या बाबतीत हेतू योग्य नाही हे स्पष्ट दिसून येते. अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिकांप्रमाणे वागणूक मिळावी अशी भाजपा सरकारची खेळी आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.