प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,थोर समाजसुधारक, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी, सार्वजनिक ठिकाण, पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याबाबत अनेक समाज सुधारनेचे कायदे बनविणारे तसेच कोकण रेल्वेसाठी प्रस्ताव मांडणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले यांची 29 जून रोजी 156 वी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्ताने तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कला,सामाजिक कार्य, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, नागरिक सेवा, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यातआले आहेत.
समाजभुषण पुरस्कार :-
१) मा. श्री. जय साटेलकर (वैद्यक )
२) मा. श्री. सुनिल रामराव शेळके (चित्रपट )
३] मा. श्री. अमोल मडामे (व्यसन मुक्ती )
४) मा. श्री. प्रभाकर वाईरकर (व्यंगचित्रकारीता )
५) मा. श्री. मिलिंद आरोलकर (पत्रकारीता )
६) मा. श्री. प्रेमरत्न चौकेकर (पत्राकारीता
समाजरत्न पुरस्कार:-
१) मा. श्री. सत्यवान रेडकर (शैक्षणिक क्षेत्र)
कोकणरत्न पुरस्कार
१) मा. श्री. सत्यजित चव्हाण (पर्यावरण )
कलाभुषण पुरस्कार
१) मा. श्री. अजय फणसेकर (कला क्षेत्र )
सहकार व उद्योगरत्न
१) मा. श्री. चंद्रकांत बी. जगताप -सहकार भुषण 2024
२) मा. श्री. अनिल काशीराम मिठबावकर – उद्योगरत्न 2024
१) मा. श्री. भरत निचिते – ओबीसी योद्धा पुरस्कार
२) मा. श्री. समिर वर्तक – पर्यावरण रक्षक पुरस्कार
३) मा. श्री. मोहम्मद अयुब हनीफ कुरेशी – ओबीसीरत्न
४) मा. श्रीमती. अलका नाईक – साहित्यरत्न पुरस्कार 2024
५) मा. श्री. निसार अली सफरदर सय्यद – झुंझार पत्रकार
६) मा. श्री. शंकर लोके – जीवनगौरव पुरस्कार 2024
या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड झाली असून, सदर पुरस्कार भंडारी मंडळ हॉल, दुसरा माळा,हेटकरी महाजनवाडी, प्र. ल. काळे गुरुजी मार्ग, दादर (पश्चिम ) मुंबई येथे दिनांक 29 जून 2024 रोजी सांय. 6 वा. ते 9 वा. दरम्यान जयंती उत्सवाच्या समारंभमध्ये वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक संतोष आंबेकर यांनी दिली आहे.