
प्रतिनिधी: सुरेश बोरले
मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस आज 24 व वर्धापन दिन साजरा करत आहे. दिनांक 10ऑक्टोबर 1999 रोजी,हा पक्ष्याचं गठण झाले.महाराष्ट्राच्या राज कारणतील महामेरू,अर्थातच मा. शरद रावजी पवार ,ह्यांनी मुख्य काँग्रेस प्रवाहातून व इतर सनातनी पक्षातून फारकत घेत स्वतःच्या हिमत्तीवर हा पक्ष उभारला.महाराष्ट्राच्या नाहीतर.राष्ट्रीय पातळीवर,त्यांचा सारखा, चाणाक्ष ,धूर्त,चपळ तेल लावलेल्या पेहेलवाना सारखा!जो की राजकारणी आखाड्यात कुस्तीच्या, प्रत्येक पेचातन,अगदी अलगद सुटणारा, राजकारणी मल्ल म्हणून प्रसिद्ध.हा पक्ष त्यांनी राष्ट्रीय पातळीवर.नेऊन ठेवला आहे.प्रत्येक प्रदेशात त्यांचे पाठीराखे आहेत,तर पक्षात त्यांनी , आपल्या मुली सहित,पुतणे व नातवांनाही,त्यांनी अगदी युक्तीने सामील केलेले आहे. महराष्ट्रातील अनेक पक्षातील माणसे त्यांचा सल्ला घेण्यासाठी,अजूनही येतात.हा त्यांचा गुण वाखांन्या सारखा आहे.त्यांच्या पक्षाने,महाराष्ट्रात अगदी यादवी माजवलेलली आहे.कारण हे कसलेले पवार साहेब,कधी कोणती खेळी खेळतील ह्याचा नेम नाही.राजकारणाच्या फडात त्यांनी मोठया मोठ्या खेळाडूंना लोलवळे आहे.सत्ता गेल्यावरही महाराष्ट्रातील,अनेक पक्ष्यांचे रिमोट कंट्रोल त्यांच्या हातामध्ये आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत,बी.जे.पी.ला आता आव्हानच राष्ट्रवादीचे आहे,यात कोणतीच शंका नाही.