
विशेष प्रतिनिधी
ज्या उत्तर भारतीय व बिहारींची डोकी मनसैनिकांनी फोडली ते हिंदू नव्हते का ? अस्लम शेख यांचा सवाल ?
कायदा हातात घेतल्यास सरकार कठोर कारवाई करणार – अस्लम शेख यांचा इशारा
मुंबई, : राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे Expiry Date संपलेल्या नेत्याने एक्सपायरी डेट संपलेले मुद्दे घेऊन केलेलं आंदोलन आहे, अशा शब्दांत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
मंत्री अस्लम शेख पुढे म्हणाले की, स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राज ठाकरेंना गंगेत तरंगणारी हिंदूची प्रेतं का दिसली नाहीत. बेरोजगारीने बेजार झालेला महागाईने होरपळून निघणारा हिंदू राज ठाकरेंना का दिसत नाही. राज ठाकरेंचे कार्यकर्ते जेव्हा उत्तर भारतीय व बिहारींची डोकी फोडत होते ते उत्तर भारतीय व बिहारी हिंदू नव्हते का..?
जे राज ठाकरे भारतीय जनता पार्टीला या देशात धार्मिक दंगली घडवायच्या आहेत असं जाहिर सभेतून सांगत होते. आज तोच धार्मिक दंगली घडवण्याचा अजेंडा राज ठाकरे स्वत: राबवत आहेत.
स्वत :च्या राजकीय पक्षाचं अस्तित्व संपल आहे, ह्याची जाणिव राज ठाकरेंना झालेली आहे, त्यामुळे राज ठाकरे आता भारतीय जनता पार्टीचे डिलिव्हरी बॉय म्हणून सेवा देत आहेत.
कार्यकर्त्यांनी मार खावा, केसेस घ्याव्या यांचे नेते मात्र पोलिसांना गाडीने उडवून पळून जाणार. कार्यकर्त्यांना केसेस लढण्यासाठी स्वत:च्या पत्नीचे मंगळसूत्र विकावे लागते तेव्हा वातानुकूलित दालनांमध्ये बसून आदेश देणारे राज ठकरे त्यांना वाचवायला येत नाहीत.
राज ठाकरेंना जनतेने गांभिर्याने घेतले असते तर त्यांच्या पक्षाची ही बिकट अवस्था नसती वार्ताहरांशी बोलताना मंत्री शेख म्हणाले.