
प्रतिनिधी:सुरेश बोरले
सध्या भारतीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा दिलेला निर्णय, हा चांगला किंवा वाईट हा काळच ठरवेल.कारण ह्या राजकारणात राज्यपालांचा अतिशय महत्वाचा भाग होता.महाराष्ट्राचे माजी राज्यपाल,श्री.भागत सिंह कोषारी!हे केंद्रातून पाठवलेले राज्यपाल होते की,महाराष्ट्राच्या राजकारणात लागलेलं ग्रहण होत.की,भारतीय जनता पार्टीचे दिल्लीहून पाठवलेले देवदूत होते.कारण महाराष्ट्रात एवढे राज्यपाल येऊन गेले, पण असा विचीत्र माणूस कधीच लाभला नाही.थोडक्यात सांगायचे तर,त्यांना विरोधकां विरूद्ध सुपारी घेऊनच दिल्लीहून रवाना करण्यात आले होते.असा लोकांना स्पष्ट संशय होता.कारण येथील राजकारणाच्या प्रत्येक बाबतीत,नेहमीच बिजेपेच्या बाजूने लुडबुड करायचे.मग ते बारा जण आमदार प्रकरण असो? राज्याच्या प्रत्येक घडामोडीत त्यांचा विरोधकांन विरुद्ध सहभागअसायचा.कोणत्याही प्रकल्पाला भेट द्यायची ते त्यांचं कामाच नवत.प्रत्येक निर्णय हा विरोधकांच्या पाचवीला पुजलेला असायाचा.अशी लुड बुड कोणत्याही,राज्यपालांनी महाराष्ट्रात केलेली आठवत नाही.विरोधकांना जेरीस आणायचे काम राज्यपाल यांनी केले होते.प्रत्येक ठिकाणी अनंत चुका!नको त्या गोष्टीत नाक खुसल्यास चुका ह्या होणारच.राज्याचा इतिहास माहिती नाही, त्या महान व राष्ट्र पुरुषांवर गबाल्या सारखे बोलायचे .महाराष्ट्राच्या आराध्य दैवत,छत्रपती शिवाजी महारजांन बद्दलची चहाडे गिरी!त्यांना भारी पडली. कारण महराजान बद्दल कित्येक वेळा इतिहास माहिती नसताना, त्यांनी नको ती अजागळ वाक्यता केली,ती त्यांना भारी पडली.कारण ह्याचा परिणाम विरोधका कडून झालाच, पण भाजपला कडूनही झाला त्यांनाही कळले की हे बांडगुळ आपल्याला अडचणीत आणणार? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गौरवशाली महाराष्ट्रातून त्यांना बाहेर काढले. त्यामुळेच त्यांना जावं लागलं हे विशेष.कारण त्यांची सगळी विधाने ही भाजपला अडचणीत आणू लागली.कादाचीत,ह्या लोकांनीच त्यांची उचलबांगडी केली असावी,असा जनतेला संशय आहे.त्यामुळे केंद्राने कोणत्याही राज्यासाठी राज्यपाल पाठवताना , त्यांच्या पात्रतेची खबरदारी नक्की घ्यावी.असे लोकांचं स्पष्ट मत आहे.शेवटी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केलेल्या चुका ह्यावर सुद्धा, न्यायालयाने ताशेरे ओढले.मग अश्याना शिक्षा का नाही?हे स्पष्ट मत जनतेचा आहे.