
File Photo
तर पंकजा मुंडे आता दोन महिने अज्ञात वासात जाणार!
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,बेटा!तो बेटा!बापरे बाप!ही म्हण परंपरागत आहे. जे बाप करू शकतो,ते बेटा करू शकत नाही.कारण बेटा तो बेटा,पण बाप तो बापच असतो. तो अनेक खस्ता खातो, मेहनतीची दारे उघडून, आपला परिवार सांभाळतो. सगळ्या गोष्टीत, आपल्या कुटुंबाला प्राथमिकता व प्राधान्य देतो. आपल्या काफील्या वर अतोनात प्रेम करतो. तेवढे प्रेम बापालाही कुटुंब सभासदांकडून मिळते.
तेव्हाच तो परिवार सुखी समाधानी असतो. म्हणजेच गॉडफादर हा लागतोच. हा प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो. कारण त्याच्याशिवाय क्षेत्र पूर्ण होत नाही. तुमचा वडील धारा असल्याशिवाय,तुम्हाला त्या क्षेत्रात वलय मिळत नाही, स्थैर्य मिळत नाही. उदाहरण घ्यायचे झाल्यास, स्वर्गीय बाळासाहेबांचे देता येईल! ते हयात असताना शिवसेना व त्यांचे कुटुंब शिखरावरती होते. त्या कुटुंबाकडे कोणाची बघण्याची टाप नव्हती. कारण बाळासाहेब नावाच मोठ कवच शिवसेनेला व कुटुंबाला होतं.माननीय, राज ठाकरे त्यांच्यावरही ते वलय आहे. पण साहेबांचं त्यांच देहावसन झालं! त्यांच्या पक्षाला व कुटुंबाला घर घर लागली. अनेकांच्या निशाण्यावर आता शिवसेना व त्यांचे कुटुंब आहे. नुकतेच भाजपात सामील झालेले, माननीय,अजित दादा पवार त्यांच्यावरही,त्यानच्या काकांचा वरदहस्त आहे. म्हणून ते येथ पर्यंत पोहोचले. फारकत घेतली हा भाग वेगळा आहे. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे, ह्या सुद्धा आपल्या वडिलांच्याच मुळे, राजकारणात सक्रिय आहेत. स्वर्गीय,शरद राव सुद्धा एक मोठ नाव कामगार जगतात होतं.पण त्यांच्या नंतर, त्यांच्या मुलाला काही जमलं नाही. डोक्यावरची छत्र छाया निघून गेली.पण स्वर्गीय, प्रमोद महाजन व स्वर्गीय, गोपीनाथ मुंडे यांना उभा महाराष्ट्र ओळखायचा! कारण त्यावेळी भाजपाला महाराष्ट्रात बिलकुल स्थान नव्हतं.बाळासाहेब व प्रमोद महाजन हेच, भाजप शिवसेना युतीचे शिल्पकार आहेत. तर त्यांचे मित्र व नातेवाईक स्वर्गीय, गोपीनाथ मुंडे यांनाही श्रेय जात. प्रमोद महाजननाच्या च्या मुलालाही काही जमलं नाही.तर माजी आमदार पंकजा मुंडे या सुद्धा राजकारणात सक्रिय झाल्या, आपल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादानेच,अचानक मुंडे साहेबांनवरती दिल्लीतून मुंबईत परतत असताना, काळाने त्यांच्यावर अचानक झडप घातली व येथेच पंकजांना सहानुभूती मिळाली. त्या भाजपात मंत्री झाल्या. पण सहानुभूतीही काही दिवसच राहते.कारण मंत्री असताना चिक्की घोटाळ्या सारखा, ठपका त्यांच्यावर पडला आणि त्यांचा राजकारणाचा आलेख खाली घसरू लागला. हळूहळू त्यांना राजकारणाने शिकार बनवले. शिवाय त्यांना निवडणुकीत हरवणारी ही त्यांचीच माणसे होती.असे जनमत आहे. त्या दिवसापासन, त्या कुठेच मोठ्या मंचावर ती दिसत नाहीत. कारण त्यांना आता भाजपने लांब ठेवले आहे, असे दिसते.कारण ती नाराजी पंकजा मुंडेंच्या चेहऱ्यावरती साफ साफ दिसते. मग अशावेळी आपण ज्या क्षेत्रात असतो, तेथे आपल्याला मार्ग सापडत नाही. इकडे आड तिकडे विहीर,अशी परिस्थिती असते. ती अवस्था पंकजा मुंडेंची झालेली आहे.कारण येथे त्यांच्या डोक्यावर वडिलानचा वरदहस्त नाही.पण सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही!असाच एक मोहरा भाजपाने गिळला.तो म्हणजे एकनाथ खडसे,अनेक आरोप झाल्यावर, एकाकी पडलेल्या खडसेंना शेवटी पक्षांतर करावे लागले. आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी. ते करणं जरुरीच होतं.पण पंकजा मुंडे असा निर्णय घेऊ शकत नाहीत, असे कदाचित दिसत.पण त्यांनाही माहित आहे की मी आहे त्या ठिकाणी मला स्तब्ध राहाव लागेल. कारण आपल्या डोक्यावर कोणाचाच हात नाही. त्यांची चेष्टा आता अनेक पक्षाने सुरू केलेली आहे. पंकजा मुंडे नी आमच्या पक्षात यावं त्यांचं स्वागत आहे. त्यांनी प्रयत्न करावा.आता तर, दिल्लीच्या गांधी पक्षाकडून त्यांना खुल्लम खुल्ला प्रस्ताव आलेला आहे. पंकजांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांच्या स्वागत आहे. कदाचित त्यांना नेतेपद देण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते,तर अशी कोणाची हिम्मत झाली असती का? त्यांना भाजपालातरी, त्यांना लांब लोटण्याची हिम्मत झाली असती का?त्याही जाणतात की आपली ही वेळ योग्य नाही. थोडासा विश्रामच घ्यावा,आणि हाच योग्य निर्णय आहे. कारण त्यावेळेस आपली वेळ खराब असते, किंवा नशीब आपल्याला साथ देत नसेल,तर आपण चीडी चूप झालेले उत्तम. कारण अशावेळी आपल्या वक्तव्याचा गैरफायदा घेऊन, आपल्या विरोधात मोहिम विरोधक उघडू शकतात, व त्यांना आपलीच माणसे कदाचित!साथ देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा शांती वनात जाण्याचा निर्णय योग्य आहे.त्यांनी स्वतः स्पष्ट केले की, मी दोन महिने, राजकारणा पासान, लांब राहणार आहेत.शेवटी कोणत्याही क्षेत्रात गॉड फादर हा लागतोच.