
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई :ज्येष्ठ सामाजसेवक, माजी नगरसेवक स्व. कमलाकर ठाणेकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रकाश आनंद प्रतिष्ठानाच्या दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्याबद्दलचा समाजसेवा पुरस्कार प्रदान सोहळार विवार दिनांक 23 मार्च रोजी, सायंकाळी 5,30 वाजता ठाणेकर हाऊस, प्रकाश आनंद भवन, तळमजला, तुरेल पाखाडी रोड, जान्हवी नर्सिग होम समोर, मालाड (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निगुडकर यांना प्रतिमा जोशी (ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या अविस्मरणीय सोहळयासाठी आपण उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक नरेंद्र मेस्त्री कार्यकारी विश्वस्त आणि सिद्राम बंडगर -विश्वस्त यांनी केले आहे