मुंबई,स्व.रफी साहेबांच्या 44 व्या पुण्यतिथी नीमीताने, दिनांक. 31 जुलै, 2024 रोजी, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे,हौशी कलाकरां तर्फे मोहम्मद रफि यांना उद्यानात गाणी गावून श्रद्धांजली दिली. स्व.मोहम्मद रफी ह्यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्ताने, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे,गोरेगावातील काहीं हौशी कलाकारांनी, उद्यानातील प्रेक्षकांसमोर रफी साहेबांची,लोकप्रिय गाणी पेश करून, त्यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रध्दांजली अर्पण केली.विशेषतः महिला श्रोत्यांनी,ह्या हौशी कलाकारांची वाहवा करत कौतुक केले. या वेळी अनेक रफी चाहत्यांनी,गाणी शांतचित्ताने ऐकली.जवळ जवळ 40 गाणी श्री.सावळाराम हूले,श्री,विजय राणे वश्री,सुरेश बोर्ले ह्यांनी आपले योगदान दिले .पार्कातील सुरक्षा रक्षकांनी ही चांगले सहकार्य केले.समुद्राच्या सान्निध्यात सायंकाळी,एक वेगळच पर्व रसिकांना या निमित्ताने पहायला मिळाले!