प्रतिनिधी:सुरेश बोरले

आशिया चषकावर भारताचा कब्जा
श्रीलंका व भारतीय संघाचा, अशीया कप 2023चा अंतिम सामना श्रीलंकेच्या मैदानावर झाला. प्राथ आज कहर केला तो,भारतीय तेज गोलंदाजांनी.नाणेफेक कौल आपल्या पदरात पाडून,लंकन कर्णधाराने,प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय चांगला व बेताचाच होता.कारण ज्याप्रमाणे श्रीलंकेने,अतिशय मेहनतीने अंतिम फेरीत प्रवेश केला!त्याप्रमाणे त्या पातळीचे खेळाडू आहेत.हा निर्णय योग्य होता.प्रत्येक कप्तान आपल्या संघाच्या क्षमतेवर निर्णय घेतो.पण पहिला झटका लंकेला,जसप्रीत बुमराने,नेहमी प्रमाणे दिला.पाहिला गडी बाद केला. बुमरा बरोबर कोण गोलंदाजीला येणार?ह्याचा मोठा सवाल होता.कारण समोर मोहम्मद सामी ही होता.पण आज मोहम्मद शिराज ला संधी मिळाली.आय. पी.एल पासन त्याने आपल्या गोलंदाजीत फार छान बदल केलेला होता व प्रगतीही केलेली आहे.ती आज श्रीलंकेत पाहायला मिळाली.पहिल्याच षटकात त्याने,आऊट स्विगरचा छान उपयोग केला व चार बळी मिळविले.अगदी यष्ट्यानना पकडुन त्याने गोलंदाजी केली.ह्या सामन्यात,कोणत्याही गोलंदाजाने!स्फूर्ती दाखवली नाही,ती आज त्याने दाखवली.एक चेंडू त्याच फलंदाजाने फटकावला,तो त्याच्या उजवीकडून, लाँगओन दिशेने गेला हा पठ्ठा तो चेंडू अडवायला,सिमे पर्यंत धावला.चेंडू सीमापार गेला.पण जगातील हा पहिला गोलंदाज ठरला! हे विशेष.त्याच स्फूर्ती मग लागोपाठच्या षटकांत एकंदरीत सात गडी सोळा चेडुत बाद करून,लंकन खेळाडू चामिंडा वास याच्या विक्रमाशी बरोबरी केली.ही एक मोठी कामगिरी आहे. हार्दिक ने ही 3 गडी बाद करत,लंकेला खिंडार पाडले.श्रीलंकेला आज फक्त 50 धवांवर रोखले.तर यापूर्वी शंभराच्या आत श्रीलंका 43,पाकिस्तान 43व परत लंका आज 50.त्यात भारतीय संघाने
क्षेत्र रक्षणही,छान केले.आज विशेष म्हणजे!मैदानावर लंकन श्रोते मोठ्या संख्येने हजर होते.आपल्या संघाची खराब कामगिरमुळे ते निराश झाले नाहीत. शेवटर्यंत उपस्थित होते,हे विशेष.शेवटी भारताने हा सामना दहा गाडी राखून जिंकला.आणि बनला आशिया चा चॅम्पियन आता केवळ एकच लक्ष्य विश्वकप जिंकायचे.