मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे तृतीयपंथीयांसाठी पाठ्यवृत्ती.

Share

प्रतिनिधी:मिलन शाह

मुंबई,भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यांत विविध प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून तृतीयपंथीयांचे गुरू, दयार यांच्या भेटी घेतल्या गेल्या; तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या ह्या मतदार नोंदणीच्या पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करत आहे. एक वर्षे कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी 10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी https://forms.gle/SiPuqkBzu3ziHNiu7  या गूगल अर्जावरील माहिती भरून अर्ज करावेत. या संदर्भातील अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा साधना गोरे (9987773802) यांच्याशी संपर्क साधावा.श्रीकांत देशपांडे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी माहिती दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *