
फोटो मन्सूर दर्वेश.
प्रतिनिधी :उत्कर्ष बोरले
मुंबई,विविध प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्थांनाच्या वतीने वातानूकुलीत लोकल ट्रेन च्या आवाजाने होणाऱ्या त्रासा बाबत पश्चिम रेल्वे तसेच सेंट्रल रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की रेल्वेच्या आधुनिकरणाचे महत्त्व असले तरी या मुळे सामान्यांच्या जीवन मनावर होणारा प्रतिकूल परिणामा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातानुकुलीत गाड्यांमुळे निर्माण होणारा आवाज रेल्वे रूळजावळील वास्तव्य करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रासदायक असा आहे. या गाड्यांचा आवाज मेल गाड्यांपेक्षा अधीक आवाज असून त्यामुळे रेल्वे रुळा जवळील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावे लागत असून या मुळे नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक प्रभाव पडला आहे. आणि सातत्याने वातानूकुलीत गाड्यांच्या वावरा मुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे या कडे रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष देने आवश्यक असून आवाज कसा कमी करता येईल या बाबत उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी निवेदन
.पॅसेंजर्स अँड ट्रॅफिक रिलीफ असोसिएशन मुंबई, वेलफेअर ऑरगॅनिसाशन फॉर रोड सेफ़टी अँड प्रीवेन्शन ऑफ ऍक्सीडेन्ट,बॉम्बे अमन कमिटी, द हलाई मेमन खांडवाणी जमात, मुंबई उपनगर, नॅशनल ह्यूमन राईट्स असोसिएशन.या संघटनान्नी रेल्वे कडे केली आहे.
आमचे घर रेल्वे रुळा जवळील वसाहतीत असून जेव्हा पासून वातानूकुलीत लोकल सेवा सुरु झाली आहे तेव्हापासून आम्हाला आवाजचा त्रास जाणवत आहे आणि हा आवाज मेल गाडी पेक्षा ही अधीक असल्याने आमचे जगणे कठीण झाले आहे.-मन्सूर दर्वेश -स्थानिक जोगेश्वरीतील रहिवासी आणि पॅसेंजर्स अँड ट्रॅफिक रिलीफ असोसिएशन मुंबई -सचिव