मुंबईत मराठी माणसांनाच घरे नाकारतात का??

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,सोमवार दिनांक 25 रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास कांदिवली पूर्वेतून मराठी तरुण  सिद्धार्थ किसन अंगुरे कामावरून  आपल्या घरी कुरार व्हिलेज येथे  परतताना कुरार व्हिलेज येथे त्याला रस्त्यात चार लोकांनी अडवून जय श्रीराम ची घोषणा देण्यास सांगितले त्याने नकार देताच चौघान्नी मारहाण केली.या मारहाणीत सिद्धार्थ अंगुरे ला  गंभीर इजा झाली व त्याच्यावर  कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दि.26 रोजी  डिस्चार्ज दिले.

. सिद्धार्थ अंगुरे या तरुणाला मारहाण करणारे  उत्तर भारतीय लोक होते . यात 

सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित आणि  राजेश रिक्षावाला यांनी शिवीगाळ करत सिद्धार्थ अंगुरेला जयश्रीराम बोलण्यासाठी दबाव टाकत त्याला जबरí मारहाण केली. अंगुरे ने जयश्री राम  बोलण्यास नकार दिल्यावर तयाला या सर्वांनी जबर मारहाण केले.

 अंगुरेच्या घरच्यांनी मध्यस्थी केल्याने तो  वाचला असं त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  मंगळवारी दि.26 रोजी सिद्धार्थ अंगुरेला कुरार व्हिलेज पोलीस ठाणे गाठल्यावर सिद्धार्थ अंगुरे च्या  तक्रारीवर कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदवला  गेला आहे.तसेच यातील 2 आरोपीला अटक केले आहे व दोन आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

 नुकतच मुलुंड येथे मराठी तरुणीला अ मराठी लोकांनी  दुकान भाड्याने देण्यास सेक्रेटरी ने नकार दिल्यावरून वाद झाला होता त्यात ह्या प्रकरणा मूळे पुढे मराठी अ मराठी असा वाद चिघडण्याची सांभावना वाढली आहे.

 काँग्रेस चे मुंबई सचिव संतोष चिकणे यांनी दि.10 मार्च 2023, रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गुजराती,जैन, राजस्थानी, धर्मीय राहत असलेल्या इमारतीत मराठी व्यक्तींना खोल्या भाड्याने अथवा खरेदी करू देत नसल्याची तक्रार केली होती. तसेच या बाबत कारवाई ची मागणी केली होती. त्या नंतर मुंबई महानगर पालिकेच्या वतीने उत्तर देण्यात आले व त्या नुसार सदनिका  कोणत्या ही धर्मा किंवा जातीच्या आधारावर घरे विकणे अथवा भाड्याने देण्याची बाब पालिकेच्या अख्त्यारीत येत  नसल्याचे म्हटले आहे.

2015 ला मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

वैभव सदाशिव रहाटे हे मालाड एसव्ही रोड येथील न्यू येरा सिनेमा लगत च्या सॉलिसीटर हाईट्स या इमारतीत आपल्या बहिण स्वाती महाडिक हिच्या  साठी सदनिका बुक करण्यासाठी गेले असता त्या वेळी वैभव यांना सेल्समन ने नाव विचारले असता त्यांनी मराठीत वैभव सांगितले तसेच थोडे वेळ बाहेर उभा राहण्यासाठी  सांगितले मग बोलावून पूर्ण नाव विचारले त्यावर वैभव रहाटे असं नाव सांगितल्यावर  सेल्समन पंकज मेहता याने सदनिका मराठी लोकांना देत नाही कारण तुम्ही लोक मास, मासळी खातात म्हणून सदनिका देत नाही असे आदेश  मालक विकासक राजेश मेहता यांच्या आदेशानुसार सांगितल्यावर वैभव रहाटे ्यांनी मालाड पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा नोंदवला होता.मात्र कारवाई शून्य.

मुस्लिम , ख्रिस्ती आदींना ही घरे भाड्यावर अथवा विकत दिली जात नाही. त्या वेळी कोणता ही पक्ष किंवा संघटना का बरं आवाज उठवत नाही?


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *