
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,मालाड पश्चिमेतील युनिटी संकुल राजन पाडा येथे बालदिनाचे औचित्य साधून सोसायटी तर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . त्यात विजेते गट क्र 1 मध्ये साहिल धोंडे, गट क्र 2आस्था रेडीज , गट क्र 3 मध्ये देवांश कोरी, गट क्र 4 मध्ये वृंदा राजापूरकर आणि गट क्र 5 मध्ये सौरीन गिध प्रथम क्रमांक पटकावला . प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ पत्रकार निसार अली व एस टी एस मिशन प्रायमरी च्या मुख्याध्यापिका ज्योती विचारे होत्या.सचिव संदीप घाग यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

अध्यक्ष लालजी कोरी यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तू देण्यात आले. लहान मुलांच्या हस्ते केक कापून बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी मुलांनी चाचा नेहरू विषयी भाषणे केली , प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना नवीन पिढीला नेहरूंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी असे आव्हान केले , अध्यक्ष लालजी कोरी म्हणाले नेहरुजी पुरोगामी विचारांचे होते त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला , शेवटी मुलांनी व सदस्यांनी नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला.शैलेश पुजारी , पांडुरंग तेली , संजना गिध यांचे विशेष सहकार्य लाभले.राष्ट्रसेवादल मालवणी चे सक्रिय पदाधिकारी प्रकाश जैस्वार जी आवर्जून उपस्थित होते.
