प्रतिनिधी :सुरेश बोरले

मुंबई, काही दिवसांपूर्वी मोबाईल मध्ये एक क्लिप फिरत होती. एक जेसीबी मशीन मालाड पश्चिमेला, एक भल मोठ लस्सी व मिठाईच, जेवणाचा हॉटेल, अशा एकूण19 ठिकाणी पालिकेच्या आदेशानुसार, वाढवलेली अनधिकृत जागा भुईसपाट करीत आहे.या कारवाईने आठवण येते ती गो.रा. खैरनार ह्यांची. महापालिकेच्या या सच्चा वीराने न घाबरता कुणीची परवा न करता अनधिकृत बांधकामे नेस्तनाबुत केली.मग ती दुबई वाल्या डॉन असो! की इतर कोणाची, गो. रा. खैरनार हेच खरे बांधकामाचे जमीन दोस्त करणारे प्रणेते आहेत. असं कोणी परत पालिकेत पैदाच झाला नाही. कायद्याच्या तरतुदी मुंबईच्या जनतेला माहित नाहीत. त्यामुळे पालिकेतील स्वार्थी लोकांचे फावते. टि. एन .शेषण ह्यांनी मतदान करताना, खर्चावर निबंध असतो, ही माहिती लोकांसमोर आणून दिली. मग मतदानाच्या खर्चाला मोठा चाप लावला.तर माहितीचा अधिकार काय असतो? याचा प्रत्यय अण्णा हजारे यांनी लोकांना दिला.म्हणून आज सरकारी व पालिकेमध्ये कर्मचारी घाबरत आहेत. आज मालाड पश्चिम म्हटले की खरेदीचे मोठे ठिकाण. येथे कपड्या पासून ते विविध वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते.आता तर लोकल गाडी ही मालाडला रिकामी होते. म्हणजे इतकी लोक वस्ती मालाडला वाढलेली आहे. त्यामध्ये मला पूर्वेला असणारे, डोंगर जो की वनविभागाचा प्रभाग आहे, तर पश्चिमेला मालवणी,खारोडी, मढ ,मार्वे या ठिकाणीही बऱ्याच प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. सदर प्रकरणात शोध घेताना समजले की,मालाड पश्चिम स्टेशनला वाहतुकीची होणारी कोंडी व लोकांना ये जा करण्याची तथा फिरण्याची जागा एकदम आखूड आहे. त्यामध्ये प्रवासी, गाड्या,रिक्षा यांची होणारी वाहतूक कोंडी,एका बाजूने बसलेले फेरीवाले याच्यामध्ये प्रवासी व लोकांचे सँडविच होऊन जाते. त्या शिवाय तेथील 19 व्यवसायिकांनी वाढवलेली अनधिकृत जागा, यामुळे कोंडी आणखीनच वाढली. याबद्दल अनेक तक्रारी झाल्या,परंतु कारवाई शून्य. हे लोकांना माहीत होतं.पण एक बादशहा राहिला तो म्हणजे हातोड धारी, किरीट सोमय्या. ते मालाड पश्चिमेला मांग्रोव्ह चे कत्तल झाल्याने,स्टुडिओ तोडायला आले होते.मग मालाड स्थानक ला का नाही गेले? हा मोठा प्रश्न लोकांना पडलेला आहे? आपला भला मोठा हातोडा घेऊन गेले असते, तर त्यांचे हातोडे तोडीने आणखी एक नाव झालं असतं. परंतु ज्याची सत्ता त्याची सरशी.हे समीकरण
अनेक वर्षांपासून या अनधिकृत जागा वाढीच्या तक्रारीवर शून्य कारवाई.म्हणजेच दिल्लीत असणाऱ्या व महाराष्ट्रात असणाऱ्या महत्त्वाच्या पक्षाच्या माणसांच्या या 19 व्यापाऱ्यांना बरोबर मोठा स्वार्थ होता. हे सिद्ध होते, असे लोकांना कळते. या प्रकरणात सखोल चौकशी केला असता असे कळते की होता. या तोडाफोडीच्या स्पर्धेत! माझे दहा तोडले तुझे चार का नाही तोडायचे? असा नाटकिय रंग कुठे रंगला असावा? कारण सखोल विचारपूस केली असता, समजते की, शेजारी असणारे पुरातन हनुमान मंदिर ही या गोत्यात जाणार होते. म्हणजे हे राजकारणी फक्त अर्थ जणाला देव मानतात. देवळातल्या देवाला देव मानत नाहीत?मग देवाचा कोप झाल्यावर मग असे नाटक घडते. भगवान के घर देर है, अंधेरी नही. सबका दिन आता है,हा निसर्गाचे नियम आहे. सुक्या बरोबर ओले ही जळते.एक समजत नाही, सोमय्याजींना फक्त कोणी हॉटेल बांधली स्टुडिओ बांधले रिसॉर्ट बांधले तेही समोरच्या पक्षाचे हेच दिसतात.मग असल्या महत्त्वाच्या ठिकाणी केलेली बांधकामे का दिसत नाहीत? तेव्हा का घोड्याची झापड लावलेली असतात. ही फक्त कोणी खबर दिल्यावर विरोधकांच्या मागे लागायचे. मग तुमची तोडफोड होणारच. मग अश्यावेळी कोणीतरी लोकांचा बाप उभा राहतो! आणि साठ्या लोट्यांचे बिघाड झाल्यावर, अशी बांधकाम जमीन दोस्त होतात.मग लोकांना मार्ग मोकळा होतो. पण म्हणतात ना भगवान के घर देर है, अंधेर नही.