प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : विशिष्ट समाजाला लक्ष्य करून द्वेष वाढविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी मालवणीतील एका मशिदीत सर्वधर्मीयांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून विशिष्ट धर्माप्रति होत असलेल्या द्वेषाला मुठमाती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राष्ट्र सेवा दल आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या पुढाकाराने रविवारी 27 नोव्हेंबरला मालाड,मालवणी येथील गेट क्रमांक 1/2 येथील दि. यंग मुस्लिम असोसिएशन च्या अंजुमन- ए- जामा मशिदी मध्ये हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन आणि बौद्ध आदी समाजातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत द्वेष नाही तर बंधुभाव टिकवण्यासाठी कार्यरत राहण्याचा निश्चय केला.

राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते निसार अली सय्यद,वैशाली महाडिक,मेरी चेट्टी, रुबीना खान,मायकल शेट्टी,कृष्णा वाघमारे,शशी गुप्ता,लक्ष्मी काऊडर,रुपेश निकाळजे,नमिता मिश्रा, जफर सय्यद,मनोज परमार,रिझवान कादरी, नासिर सय्यद, वसीम मुजावर, अलिमुद्दीन शेख,आदींच्या पुढाकाराने दिवाळी आणि ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

25 सप्टेंबर 2022 रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मध्ये मुस्लिम समाजातील तरुणांना आजच्या परिस्थिती बद्द्ल नेमके काय म्हणायचं आहे?मुस्लिम समाजा बद्द्ल आपले आकलन काय आहे.? मुस्लिम समाजावर असलेले आक्षेप आणि त्यावर या तरुणांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्याच्या अनुषंगाने ‘ मुस्लिम समाजाचे प्रश्न ‘ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते. सातारा येथील मिनाज सय्यद व कुरुंदवाड येथील साहिल कबीर यांनी या कार्यशाळेत मुस्लिम प्रश्नावर मांडणी केली होती. या कार्यशाळेत ठरल्या प्रमाणे मालवणी, मालाड येथे हिंदू,मुस्लिम भावा बहिणीचे संवाद वाढविण्यासाठी,सलोखा टिकविण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचे ठरले होते.

रविवारच्या कार्यक्रमात सर्व धर्मीय तरुणांनी आपले मनोगत मांडले. आमचे प्रश्न शिक्षण, आरोग्य, नोकरी, व्यवसाय आणि आत्मसन्मान हे आहेत. दुसऱ्या धर्मातील माणसांचा द्वेष करणे हा आमचा कार्यक्रम नाही. आमच्या रोजच्या जगण्याच्या या प्रश्नाच्या सोबत आम्ही कायम राहू.

आमच्या लहानपणी इतका द्वेष आम्ही पाहिला नव्हता किंबहुना आम्ही सगळे एकत्र खेळलो,एकत्र वाढलो हा या धर्माचा तो त्या धर्माचा याची जाणीव ही होत नसे असे ज्येष्ठ असलेल्या काही नागरिकांनी सांगितले. मात्र आता हे ठळकपणे जाणवू लागले आहे अशा प्रकारच्या संवादाने ही दरी कमी होवू शकेल असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत असे तरुण मुलींनी सांगितले. लवकरच आरोग्य शिबीर आणि अशाच सलोख्याचे कार्यक्रम मालवणी येथील गुरुद्वारा,मंदिर,मस्जिद आणि चर्च परिसरात घेण्याचे सूतोवाच निसार अली सय्यद यांनी केले.

या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम,श्रीधर क्षीरसागर विजय तांबे, महादेव पाटील,संघर्ष वाहिनीचे जयंत दिवाण,उत्कर्ष बोर्ले, आईशा खान, रोशनी शेख, सुमय्या शेख, शबनम शेख, फिरोझ अन्सारी, अफझल अन्सारी, पूनम चौधरी, निकोलस पटेल, स्टॅनली फर्नांडीस, जोसेफ डिसोझा, सुनीता सिंग,किरण कांबळे, बाशा भाई, फिरोझ खान, रहमत शेख,अस्मा अन्सारी, बाळा आखाडे, आसिफ शेख,पंकज कपूर, प्रकाश जैस्वार, इम्रान शेख, निकोलस पटेल,शबनम शेख, अल्फीया शेख, पिंकी जैनब शेख, सोनू जाहीदा शेख
प्रभूती उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी दिवाळीचा फराळ आणि शीर कुर्मा खावून कार्यक्रम संपन्न झाला.