
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मुंबई, मालाड पश्चिमेतील भंडारवडा इंद्रायणी सोसायटीत पालिकेकडून चांगल्याप्रकारे पाण्याचा पुरवठा होऊनहि काहि सदनिकाधारक पाण्याच्या विद्युत मोटारीचा सर्रास वापर करीत आहेत.इंद्रायणी सोसायटीत 120 सदनिका आहेत. यात सव्वाशे नागरिक राहत आहेत. या इमारतीतील काही लोक नियम मोड करत विद्युत मोटारीचा वापर अधिक पाणी मिळवण्यासाठी करीत असल्याने
या इमारतीतील इतर सदस्यांना मुबलक पाणी वापरा करिता ही मिळत नसल्याने त्यांना पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. या इमारतीतील रहिवासी लक्ष्मण केळुस्कर यांनी या बाबत पालिका पी उत्तर विभागाच्या जल खात्यात तक्रार ही केली आहे मात्र अद्याप पालिके कडून अनधिकृत विद्युत मोटारी काढण्या बाबत काहीच कारवाई झाली नसल्याची माहिती लक्ष्मण केळुस्करांनी दिली आहे. तसेच इंद्रायणी एस.आर.ए गृह निर्माण सोसायटी ळा ही या बाबत तक्रार दिली आहे मात्र त्यांच्या कडून ही कारवाई होत नसल्याने या इमारतीतील रहिवासी संतप्त झाले आहेत.
तसेच त्यांनी पालिके कडे त्वरित कारवाई ची मागणी केली आहे.