
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याच्या हत्येने हादरली मुंबई.
मुंबई,बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथून आमदार आणि मंत्रीही राहिले आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचे मुंबईचे राजकारण आणि बॉलीवूडमध्ये मजबूत संबंध होते पूर्वी ते काँग्रेस पक्षात होते व दिवंगत सुनील दत्त यांचे खंदे समर्थक होते.आज दिनांक. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेतील परिसरात सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला या हल्ल्यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. झीशान बाबा सिद्दीकी हे वांद्रे पूर्वेतून काँग्रेस चे आमदार आहेत पण त्यांनी नुकतेच बंड करून अजित पवार गटात सामील झाले होते तसेच त्यांचे मुंबईतील काँग्रेस चे एका वरिष्ठ नेत्या बरोबर वाद विवाद ही पक्ष सोडण्याचे कारण झाल्याचे बोलले जाते तसेच बाबा सिद्दीकी हे काँग्रेस चे ज्येष्ठ आणि विश्वासू असून ही त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ का आली होती व त्यांचे पुत्र हे काँग्रेस चे आमदार असून ही त्यांनी पक्ष का सोडले तसेच वांद्रे पूर्वेत त्यांनी शिवसेना गटात सामील झाल्यानंतर जोमाने पक्ष संघटना वाढवण्याचे कार्य करत होते तसेच महाराष्ट्राच्या निवडणुका नुकत्याच जाहीर होणार आहेत आणि त्याच दरम्यान आज सिद्दीकी यांची हत्या झाली.त्यामुळे
नव्या अंडरवर्ल्डने मुंबईत पाय पसरले कि काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.