
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समिती तर्फे, दर्शनासाठी अत्यंत शिस्तीत 7 किलोमीटर लाईन लावून दर्शन घेणाऱ्या उपासक व उपासिकांना आणि लहान चिमुकल्यांना भविष्यात निळं वादळ आणण्यासाठी निळं पेन,कंपाऊस पेटी, 22 प्रतिज्ञा व निरोगी जीवन जगण्यासादर्भात मार्गदर्शन पत्र आणि बिस्कीट चे वाटप करण्यात आले.

अथक मेहनत करणारे सुनील शहापूरकर, प्रीती श्याम झळके, प्राची झळके, आशिष झळके, धनाजी आणि राजा मेशनोर यांनी दिवस रात्र परिश्रम घेतले तसेच महपरिनिर्वाण दिनी संपूर्ण दिवस वाटपात मदत करत होते.
