प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,अभिमान पालक गटाकडून गोरेगावातील मराठी शाळांकारिता निधी संकलन करण्या साठी जत्रेचं आयोजन. शिक्षण मंडळ गोरेगाव संचालित तीन मराठी शाळांकारिता गोरेगाव येथील अ. भी. गोरेगावकर शाळा आरे रोड गोरेगाव पश्चिमेत दि.23, ते 25 डिसेंबर ला दुपारी 3 ते रात्री 10वाजेपर्यंत भव्य व्यापारी जत्रेचं आयोजन करण्यात आले आहे.पालकांचा सहभाग असणारा हा अतिशय उत्तम उपक्रम आहे.महत्वाचं म्हणजे या उपक्रमात सहभागी होण्याकरीता प्रसिद्ध कलाकार व्हिडिओ द्वारे संदेश देत या उपक्रमाची स्तुती करत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या जत्रेला यावे असे आवाहन ही केले आहे.