
प्रतिनिधी :सुरेश बोरले
भारतीय राज्य घटना म्हणजेच सर्व धर्म समभाव, बंधुता,अनेकता मध्ये एकता असे अनेक पैलू फक्त कागदावरती आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत वेगळी आहे.भारतावर अनेकांनी राज्य केले, त्यामध्ये मोगल आले, ब्रिटिश आले. त्यापूर्वी पुरातन व पुरोगामी लोकांनी ही या भारतावर राज्य केले. या हल्लेखोरांनी जाताना मात्र आपली छाप हिंदुस्तानावर कायमची सोडली. अनेकांची बाटावा बाटीवी केली. कत्तली केल्या, धार्मिक वास्तु जमीनदोस्त केल्या. असे अनेक हिन प्रकार व प्रहार या हिंदुस्थानावर केले. हिंदू धर्म कोणी कधी स्थापला याचे पुरावे सापडत नाहीत. पण ती एक अतिशय चांगली संस्कृती आहे. ह्याच संस्कृतीच्या विचारांचा पडघा,श्री रामा सारख्या माणसावर पडला त्याने धर्मसेने सारखी कामे केली.म्हणून त्यांची पूजा ही ईश्वरासारखी भारतीय करतात. मग वर्ण निर्माण झाले. या वरणांच्या धोरणाने उभ्या भारताचा घात झाला. या वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ ठरला. ह्याच जमातीने या उभ्या हिंदुस्थानात जाती जमातीची बी पेरले, हे सत्य आहे. आज आपण ब्राह्मणांची वागण्याची पद्धत पाहतो, अतिशय चतुर व हुशार जमात आहे.ही कदाचित त्यांना वारसने दिलेली देणगी आहे. त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या हा वारसा आहे. आणि तो असायलाच हवा. असो! सगळ्यात भारताचा काळाकुट्ट दिवस म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर!ज्या घटना कारांनी ही भारतीय घटना लिहिली, येथे फक्त भारतरत्नांचे नाव घेणार नाही, कारण घटना बनवणे किंवा लिहिणे एकाचे काम नाही. जी कुणी विशारद मंडळी असतील, त्यांनीच या हिंदुस्तानी शकले बनवली. या घटना लिहितना,का नाही असे लिहिले. जो या राष्ट्रात जन्मला तो भारतिया किंवा हिंदुस्तानी!असे पक्के विधान का नाही मांडले. प्रत्येक पोट जातीला वेगळा कायदा? अशा घटनांच्या आधारे आज भारताची राजनिती चाललेली आहे. हजारो जाती जमाती आहेत, मग एखादा उठतो, मग दुसरा उठतो. साहजिकच होणार! हिंदुस्थानामध्ये समता बंधुता सर्व धर्म समभाव कधी होणार नाही. हा राष्ट्राचा आंतरिक प्रश्न आहे. राज्या राज्यात आपल्या परीने तो पिढ्यान पिढ्या धुमसत राहणार, हे सत्य आहे. ह्या प्रशनावरन कधी राजस्थान पेट्टणार, तर कधी महाराष्ट्र पेटणार?आत तर पूर्वेकडील मणिपूर राज्य जाती जमतीनच्या मुळे धुमसतय. जातीला पोट जात आहे. त्याप्रमाणे तेथे मैनेही जमातीतील लोकांनी आंदोलन करून,या जातीला ओबीसी दर्जा व आरक्षण मिळवले.मग आम्हाला का नाही?हा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आलाच? महाराष्ट्रात मराठा समाज, आपल्या उन्नतीसाठी आंदोलन करतोय. ह्यात काय चूक आहे? घटनेची फळ इतर जाती जमातींनी भोगली,आता ह्यांना का नाही?आत्ता तर मुस्लिम समाज धनगर समाज, साळी माळी समाज, कुणबी समाज व इतरही तयारीत आहेत.कारण घटने प्रमाणे,आरक्षण किंवा सरकारी सुविधा ह्या त्या ठराविक जातींना, त्याही फकत काही वर्षा साठीच होत्या,मग आज काय?कुठे गेली घटना?म्हणजे आंदोलने वगैरे ठराविक जमातीने करावी? बाकीचे कांहीं ह्या राष्ट्राची लोकसंपत्ती नाही काय?ते फक्त स्वरण आहेत,त्यांच्याकडे संपतीच्चे घबाड आहेत का?मग मणिपुरी जनतेने व इतरांनी आपला हक्क मागू नये का?त्यासाठी हा प्रकार घडत आहे.ह्याची केंद्राने दखल घ्यावी. म्हणजेच सामाजिक विषमता ही भंपक तत्वावर बोगस आधारावर असल्याने ही विषमता पसरते. यामध्ये काही घटनाकारांनी, आपल्या जाती जमातीचे आरक्षण सरकारी सुविधांचा लाभ जे पाहिजे ते करून घेतले.का! तर इतर जाती जमाती या पांढर पेशीय आहेत. पण ती सुद्धा आपल्या राष्ट्राची माणस आहेत. आपल्या देशाची संपत्ती आहे. या गोष्टींचा विचार अनेक घटना लेखकांनी का नाही केला. फक्त आपला स्वार्थ साधला बस! त्यामुळेच मोठ्या मुश्किलीने माननीय.सरदार वल्लभभाई पटेल सारख्या नेत्यांनी हिंदुस्तान हे राष्ट्र एकत्र केले. ते येणाऱ्या काळात तुकडे पडण्याच्या मार्गावर आहे,या शंका नाही. आता हेच पहा ना मणिपुर राज्य जास्तीत जास्त इंग्रजांच्या धरतीवर चालते,इथे इंग्रजीमध्ये जास्त बोलावे लागते. मग या घटनेप्रमाणे भाषानुसार प्रांत रचनेचा उपयोग काय? आपण कर्नाटका पासून ते तामिळनाडू, केरळ राजा पर्यंत जा!तिथे राष्ट्रभाशेला दर्जा नाही.याचा विचार घटनाकांरांनी का नाही केला? एका बाजूला पंजाबात एक गट आम्हाला खलिस्तान राष्ट्र पाहिजे!असे विचार तिथे पसरवतो. हि सगळी देण घटनेची आहे.जो पर्यंत ही तकलादु लोकशाही घटना व प्रजासत्ताकाचे ढोंग पांघरून राष्ट्रपुढे जात आहे.
पण जाती जमातीच्या घटनानमुळे, राष्ट्र पुन्हा मागे पडते. सध्या आपण मणिपूरची परिस्थिती दुरचित्रवाणी पाहतो,ह्या असल्या जाळपोळ,फोडा फोडीत सरकारी संपत्तीची लोक वाट लावतात. कारण सरकारवर अशा प्रमाणेच लोक राग काढणार. दुसरा पर्यायच नाही. अशा सरकारी वस्तूंची ना सधूस केल्याने, आपण कमीत कमी दहा ते पंधरा वर्षे मागे जातो. आर्थिक गटबंधन देशाचे होत नाही. कारण सरकारी मालमत्तेचे आपण जर का अशा प्रकारे नासघुस केली,तर मग सरकार या संपत्तीची वसुली, जनतेवर कर लावूनच करणार. एका बाजूने करवसुली व दुसऱ्या बाजूने महागाईचा आगडोंब, आपल्या राष्ट्राला आर्थिक बाबतीत,बरेच वर्ष मागे नेतो. मग सगळीकडे जर मणिपूर सारखी परिस्थिती झाली तर मग भारताचे काय होणार? जर आमच्या घटनेच्या सुविधांनी सर्वांगीण विकास करून जाती-जमातींना फाटा देऊन,या राष्ट्रात जन्मलेला, हा फक्त भारतीय आहे व त्याला समानतेचा कायदा हा सक्तीचा. असावा.त्या विद्वानानी निर्णय का नाही घेतला? बाकी जात-पात धर्म लोकांनी आपल्या घरी ठेवावा किंवा जपावा. असा निर्णय जर का त्या विद्वानानी घेतला असता, तर अशी मणिपूर सारखी घटना घडली नसती. भारत आज प्रगतीशील राष्ट्र बनले असते. घटनेच्या आधारे जाती जमातींच्या बेड्यात अडकलेला भारत, त्यामुळे ह्या राष्ट्राचा विकास होत नाही. सगळं कठीण आहे. या सगळ्यांचा किंवा गोष्टींचा वीट तरुणांना आलेला आहे.मग ते आपला हिंदुस्तान सोडून अमेरिका,कॅनडा,ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जातात व तिथे कायमचे वसतात. त्यांचा काय चुकलं? तेही परत भारतात न येण्यासाठी. मणिपूरचे, आपण फक्त उदाहरण घेतले आहे. शेवटी राष्ट्रप्रेम महत्त्वाचे आहे. मी स्वत कुणबी जातीचा आहे ओबीसी गटात पडतो. मी कुणाचे समर्थन करीत नाही. माझ्या राष्ट्रात मला शांती हवी,हाच उद्देश आहे.