प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई, मढ शिवाजी नगर आणि पासकल वाडी परिसरातील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून मुबलक पाणी मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मढ शिवाजी नगर 1आणि 2,3, ते पास्कलवाडी पर्यंत गेल्या 15 दिवसा पासून पाण्याची खूप टंचाई सहन करावी लागत आहे. त्यामुळे रहिवासी चांगलेच संतापले आहेत.
पाण्याची समस्या वाढत असल्याने पिण्यासाठी ही लोकांना पाणी मिळत नाही.पाणी पुरवठ्याची चावी स्मशान भूमी जवळ असून ती चावी कर्मचारी वेळेवर उघडत नाही यामुळे देखील पाण्याची समस्या होत आहे. तसेच पाण्याचा पुरवठा देखील कमी दाबाने होत असल्याने जवळ पास तीन ते चार हजार नागरिकांना पाण्याची समस्या सतावत आहे. या बाबत स्थानिक रहिवाशांनी पालिका पी उत्तर विभागातील जल खात्यात वेळोवेळी माहिती व तक्रारी दिल्या आहेत.महानगरपालिकेचे अधिकारी तक्रार केल्यावर दुर्लक्ष करतात. रहिवाश्यांनी फोन केल्यावर तेथील कर्मचारी खोटी खोटी आश्वासन देतात.पाणी मिळेल असे खोटे सांगितले जाते पण तस काही होत नाही असे आरोप स्थानिक रशिवसी करत आहेत.

मात्र शिवाजी नगरच्या मागच्या बाजूला असलेल्या उंच उंच इमारतीत पाणी नियमित व व्यवस्थित दाबाने मिळतं. मग गरिबांच्या झोपड्यात पाणी का बरं येत नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि शेकडो फूट उंची वर पाणी बरोबर जाते पण शिवाजी नगर वस्ती जमिनीवर असून ही कमी दाबाने पाण्याची पुरवठा का असा सवाल ही विचारला जात आहे.
चौकट :
एकीकडे पालिकेने दावा केला आहे कि दहा टक्के पाणी कपात रद्द केली मात्र दुसरी कडे मढ सारख्या ठिकाणी असलेल्या वस्तीत पिण्यासाठी पण पाणी मिळत नाही.या बाबत स्थानिक नगरसेविका संगीता सुतार,आमदार अस्लम शेख, खासदार गोपाळ शेट्टी तसेच पालिका सहाय्यक आयुक्त पी उत्तर विभाग यांना ही माहिती देत पाणी समस्या सोडवण्याची विनंती केली आहे.
…………..
आमच्या येथे पाणी पुरवठा रात्री 8 ते 10.30 वाजेपर्यंत होतो मात्र खूपच कमी दाबाने पाणी येत.आम्ही पाण्याच्या समस्ये बाबत पालिका पी उत्तर विभागातील अभियंता जालकामे यांच्या कडे अनेक तक्रारी केल्या आहेत. काही वेळेस पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आले पाहणी केली व परतले मात्र समसयेचा समाधान झालेला नसल्याने आमचे हाल होत आहेत.
-आमिर सय्यद -स्थानिक रहिवासी
…….
आम्हाला पिण्यापुरते ही पाणी मिळत नसल्याने आमचे हाल होत असून आम्हाला बाहेरून पाणी विकत घ्याव लागत आहे.यामुळे आमचे दररोज 200 ते 250 रूपये खर्च होत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे कामासाठी ये -जा करण्यास वेळ जातो आणि थकून घरी परतल्यावर पाण्यासाठी वन वन भटकण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे शारीरिक त्रास तर होतोच पण मानसिक खच्चीकरण ही होत आहे.
-मधू सिंग -स्थानिक रहिवासी महिला
………………
जलवाहिनीला गळती लागली होती. त्याची मार्वे रोड वरील जलवाहिनी दुरुस्त केली तसेच कावड यात्रे मुळे काम पूर्ण झाले नाही दोन तीन दिवसात काम करून नियमित पाणी पुरवठा होईल.राकेश शिंदे -सहाय्यक जलभियंता पी -उत्तर विभाग
#जल ही जीवन है
चा संदेश देणाऱ्या मुंबई महानगर पालिकेला विसर पडला वाटत आहे