
प्रतिनिधी :पराग बुटाला
कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज
कुंभरोशी, महाबळेश्वर येथील विद्यार्थ्यांची शालेय गरज लक्षात घेऊन मुंबईतील दादर येथील भूषण प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शालेय उपयोगासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘शालेय वर्गखोलीचे भूमीपूजन समारंभ’ उदघाटन सोहळा नुकताच ‘भूषण प्रतिष्ठान’ चे संस्थापक -अध्यक्ष भूषण पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव अध्यक्ष किसन दादा जाधव, उपाध्यक्ष फळणे एम.पी, सचिव डि. के.जाधव, स्कूल कमीटी संचालक, अध्यक्ष बी. व्हि. शेलार, संचालक धों. श.जंगम, कोयना एज्यूकेशन सोसायटी तळदेव ग्रामस्थ मंडळ कुंभरोशी व पंचक्रोशी, मुख्याद्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच भूषण प्रतिष्ठान दादर मुंबई चे सदस्य उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष भूषण पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना म्हंटलं की आपल्याला मोठ करतांना आपल्या आई – वडिलांचे मोठे कष्ट असतात. त्यांच्या कष्टाचा आदर करा, त्याची जाण ठेवा चांगले शिक्षण घ्या, लिखाण व वाचनात सातत्य ठेवा आणि विशेष म्हणजे व्यसनापासून दूर राहा असा सल्ला पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान भूषण प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वांना दिवाळी फराळ, मिठाई, सुगंधी उठणे वाटप करण्यात आले.
