
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,काल मुंबईत ,बाळा साहेबांचं स्मृती स्थळ परिसराचे
अतिशय निंदनीय चित्र सतत माध्यमातून दाखवले जात होत!ते म्हणजे आज दि.17 नोव्हेंबर रोजी हिंदूरुदय सम्राट मा.बाळा साहेबांचा स्मृती दीन आहे. तत्पूर्वी पूर्व संध्येला,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार,खासदार हे आजच स्मृती स्थळाला भेट देऊन निघुन असताना,कांहीं माणसे आत होती.त्याठिकाणी उधव ठाकरे गटाचे शिव सैनिक, ज्यांना ” उभाठा “म्हणून हिणवले जाते,हे चु कीच आहे,मग तुम्हाला खोके व “गद्दार”का म्हणू नये,असे लोक म्हणतात. हा गट तेथे चालून आला व त्याठिकाणी महिला कार्यकर्तेही शिंदे गटाच्या हजर होत्या.त्यांना मारहाण केल्याच्या आरोप उधव गटावर केले .खर पाहता,दोन्ही गटाकडून,चुका ह्या झालेल्या आहेत.तर त्याचा तमाशा इतर राजकीय पक्ष पाहतआहेत.दोन्ही बैल किंवा कोंबडे झुंजवनारा पक्ष भाजप हा मजा पहात आहे!हे लोकांचं म्हणणं आहे आणि ते त्यांना पाहिजेच आहे.एक मोठी चूक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजिंनी केलेली आहे,ती म्हणजे!राष्ट्रवादी व काँग्रेस ह्या पक्षान बरोबर केलेली युती,ही महा चुकीची आहे. एकतर आपण विरोधात रहायला हवे होते किंवा ठाम राहिला असता,तर आजची परिस्थिती आलीच नसती व आपला वरचष्मा राहिला असता.तर शिंदे गटाने,आपली वेगळी चूल मांडली.म्हणजेच पक्षा बरोबर फारकत घेतली.ही पण एक क्षमा न करण्या सारखी महाचूक आहे.तुम्हाला जर मा.उधवजिंची यूती मान्य नव्हती,तर मग आपण जाहीरपणे लोकांना सांगून फारकत घ्यायला हवी होती!की, मा.उधवजी ही युती आम्हास मान्य नाही.आम्ही वेगळे होत आहोत.हे झाल असता तर आपल्याला जाहीरपणे मान मिळाला असता.अस ही लोकांचं मान्न आहे.नागपूरकरांच्या संगतीला लागून,आपण जो छुपा खेळ खेळलात हे सुध्धा घातक आहे.ज्याने पक्षात दुफळी झाली. कालचा प्रसंग घडला,ह्याची मजा पर प्रांतीय घेत आहेत.हे लक्षात असू द्या.कशाला गुपचूप स्मृती स्थळावर येऊन जाताय!स्वाभिमानाने त्याच दिवशी या!वाद नको म्हणून घाबरताय! पक्षाशी फारकत ही कुणालाच पटणारी नाही,खास करून कट्टर कार्यकर्त्यांना,म्हणून हे कालच कृत्य घडल.तोच उद्रेक लोकांना पहायला मिळाला.दोनही गट समोरा समोर आले व अर्वाच्च शिव्या व शाब्दिक आगपाखड दोन्ही बाजूंनी झाली.एक मेकांवर चालून येणे ह्या गोष्टी होणारच!पण ह्याचा तमाशा ज्या नागपूरकरांनी लावला ते व त्यांचे साथीदार एकही शब्द न बोलता दुरून मजा पाहत आहेत.हे त्यांना पाहिजेच आहे.हे एक गौड बंगाल आहे. ही वर्तमान मुख्यमंत्र्यांची उचल बानगडीची नांदी तर नाही!असा लोकांना संशय यतोय.येणाऱ्या निवडणुकीत, आपल्याला वेगळेच पण झटक्याचे निकाल पाहायला मिळतील.कारण साहेबांच्या स्मृती स्थलावर झालेला हैदोस हा उदासीनता आणणारा आहे.पाहू स्वर्गातून बाळा साहेबांचा कोणाला आशीर्वाद लाभतोय?कारण नागपूरकरांनकडे, घड्याळाचे परवरदिगार सी एम.च्या गाडीवर बसायला तयार आहेत.त्याचेच हे प्रयोग चालले आहेत.कारण काल झालेल्या घटनेत कोणाचा हात आहे,हे येणाऱ्या काळात माहित पडेलच.पण असे निंदनीय कृत्य स्व.बाळासाहेबांच्या स्मृती स्थळ ठिकाणी होण,ही एक अतिशय शर्म वाटणारी गोष्ट आहे.हे लोकांत या बाबत चर्चा सुरु आहे.आणि हर साहेबांच्या इब्रतीला शोभणारे नाही.ह्याची नोंद जनतेने घेतली आहे.